मागील 12 पैकी 9 महिने मुंबईची हवा होती प्रदूषित

मुंबई शहर हे प्रदूषित बनले आहे. याचे खुलासे  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी त्यांच्या अहवालातून केले आहेत. २०२२ या वर्षात ३६५ दिवसांपैकी तब्बल २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.

मुंबई परिसरातीलही हवा प्रदूषित 

मुंबई आणि उपनगरात वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाच्या विकारासोबतच इतर त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील ३-४ दिवसांपासून ३३० पार दिसते. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. समोर आलेल्या एका अहवालात २०२२ सालात मुंबईतील ३६५ दिवसांपैकी २८० प्रदूषणाचे असल्याचे समोर आलेआहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ सालात मुंबईच्या सर्व विभागात प्रदूषणाचे आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसोबतच नवी मुंबई, कल्याण आणि ठाण्यातील हवा गुणवत्ता देखील खालावली आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तरमुंबईचा एक्यूआय शून्य ते ५० मध्ये ४० दिवस बघायला मिळाला तर इतर दिवस तो ५० च्या वरच बघायला मिळाला.

(हेही वाचा मी कुठं सांगितले माझ्या काकाला ‘जाणता राजा’ म्हणा; अजित पवारांचा शरद पवारांना टोला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here