मुंबईची हवा काय सांगतेय? आता तुम्हालाही सहज कळणार

100

मुंबई हे शहर स्वप्नाची नगरी म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मुंबईत स्वतःच हक्काचं एक लहानसं घर असावं यासाठी देखील धडपडत असतो. मुंबईत प्रचंड लोकसंख्या असल्याने वाहनांची संख्याही तितकीच आहे. वाहनांचा सर्वाधिक वापर याच मुंबईत होत असल्याने प्रदूषण पातळी देखील तितकीच वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा ही प्रदूषित आणि अस्वच्छ झाल्याने श्वसनाच्या आजाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हा चिंतेचा विषय काहीसा दूर होणार आहे. कारण मुंबईतील हवेच्या दर्जाविषयी अंदाज करणे आणि हवेचा दर्जा खालवला असताना आरोग्याची चेतावनी देणे आता अधिक सुलभ होणार आहे.

मुंबईचे नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क होणार

हवेच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रत्येकी ४ किलो मीटरच्या परिसरातील रिअल टाइम – डेटा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका सेन्सरवर आधारित १२८ सिस्टम्स इन्स्टॉल करणार आहे. हवेच्या दर्जाचे मुंबईचे नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठे नेटवर्क होणार आहे. आरोग्यविषयक सल्ला आधीच दिला तर खालावणाऱ्या हवेच्या दर्जापासून नागरिक व धोकादायक पातळीवर असलेले गट म्हणजे ज्येष्ठ नागरिक, मुले, गरोदर महिला इत्यादी स्वतःचे संरक्षण करू शकतील, असा आशावाद आवाज फाउंडेशनने व्यक्त केला आहे.

हवेच्या प्रदूषणामुळे काय होते?

  1.  श्वसनाशी संबंधित अवयवांवर नकारात्मक परिणाम होतोच.
  2. मेंदू व प्रजनन यंत्रणेवरही परिणाम होतो

आवाज फाउंडेशनने एका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका सोशल मीडिया माध्यमांच्या माध्यमातून शहरवासीयांपर्यंत पोहोचू शकते. मुंबईतील हवेच्या दर्जाच्या निर्देशांकाची पातळी रडियो चॅनल, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल आणि सार्वजनिक ठिकाणी दर्शविणे अनिवार्य करावे. हवेच्या प्रदूषणाशी आरोग्याच्या समस्यांचा त्रास असलेल्या नागरिकांना या चेतावनीचा फायदा होण्यास मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.