विमान प्रवासासाठी आता ३.५ तास आधी पोहोचा! प्रवाशांसाठी नवी अ‍ॅडव्हायसरी

87

मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. विमानतळावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वाहतूक मंत्रालयाने एक नवी अ‍ॅडव्हायसरी जारी केली आहे. यामध्ये विमानतळावर पोहोचण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश )

आता आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना विमान पकडण्यासाठी साडेतीन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागणार आहे. तसेच देशातंर्गत उड्डाणासाठी प्रवाशांना अडीच तास आधी विमानतळावर पोहोचावे लागेल.

१ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई विमानतळावरील संगणक प्रणालीतील अचानक बिघाडामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि याचा परिणाम फ्लाइट टेक-ऑफ, चेक-इनच्या वेळापत्रकावर झाला. यामुळेच विमानतळ अधिकाऱ्यांनी हा महत्त्वाचा सल्ला प्रवाशांना दिला आहे.

 

“छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोव्हेंबर-डिसेंबर महिना सुरू झाल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे आणि येत्या आठवड्यात ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना विनंती करतो की, विमानतळावरून प्रवास करणार्‍यासाठी, अतिरिक्त वेळ द्यावा. असे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.