विमान प्रवास करणार आहात? मुंबई विमानतळ धावपट्टी ‘या’ दिवशी सहा तास बंद राहणार

पावसाळ्यानंतर विविध कामे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या येत्या १८ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी विमान सेवेसाठी आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांची गैरसोय होणार असून विविध कंपन्यांना सुद्धा त्यांच्या विमान सेवा रद्द कराव्या लागणार आहेत.

( हेही वाचा : जे.जे.रुग्णालयात सेवा सप्ताह संपन्न! )

१८ ऑक्टोबरला धावपट्ट्या बंद 

मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ९/२७ मुख्य तसेच पर्यायी धावपट्टी आहे. ही धावपट्टी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात धावपट्टीच्या दोन्ही बाजूसा दिवे, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे. ११ ते ५ या सहा तासांमध्ये ही दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ नंतर ही धावपट्टी विमान उड्डाणासाठी खुली करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाआधी संबंधित विमान कंपन्यांकडून माहिती घ्यावी असे आवाहन मुंबई विमानतळ प्रशासनाने केले आहे. याआधी सुद्धा या धावपट्ट्या १० मे रोजी सहा तास बंद करण्यात आल्या होत्या. या धावपट्ट्यांवरून दररोज ८०० हून अधिक विमाने उड्डाण करतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here