छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 10 मे रोजी सहा तास बंद राहणार आहेत. त्यामुळे विमानतळावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्याचा जवळपास 122 उड्डाणांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यापूर्वीची काम करण्यासाठी धावपट्ट्या बंद
मुंबई- मान्सूनच्या आगमनापूर्वी सर्व प्राधिकरण नियोजित कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई महापालिकेनेही नालेसफाई सुरुवात केली आहे. आतापर्यंत 40 टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाल्याचे समोर आले आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पावसाळ्यापूर्वीची काम करण्यासाठी 10 मे रोजी दोन्ही धावपट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा: लस घेण्याची सक्ती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय )
या वेळेत धावपट्ट्या राहणार बंद
पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीसाठी विमानतळाची धावपट्टी मंगळवार, 10 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान बंद असेल. यादरम्यान विमानतळाच्या 14/ 32 व 09/27, या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील. या दरम्यान एकही विमान येणार नाही किंवा उड्डाण होणार नाही. तशी सूचना सर्व विमानसेवा कंपन्यांच्या वैमानिकांना देण्यात आली आहे, असे विमानतळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
वर्षातून एकदा धावपट्टी बंद करण्यात येते
संध्याकाळी 7 नंतर सर्व सेवा पुन्हा नेहमीप्रमाणे सुरु होतील. त्यामुळे प्रवाशांनी 10 मे रोजीच्या शेड्युल्ड फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाईनकडे चौकशी करावी असे आवाहान केले आहे. आपत्कालीन ऑपरेशनमध्ये विमानतळावरील धावपट्टी वर्षातून एकदा बंद केली जाते. जेणेकरुन धावपट्टीची देखभाल आणि दुरुस्ती करुन आवश्यक त्या सुरक्षा घेणे शक्य होते.
Join Our WhatsApp Community