प्रजासत्ताक दिनी मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका; शिवाजी पार्क प्रतिबंधित क्षेत्र

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर हवाई हल्ला केला जाऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संभाव्य हल्ला लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना 26 जानेवारीला शिवाजी पार्कवर हवाई हल्ला होणार असल्याचे इनपुट मिळाले आहेत. त्यानुसार सुरक्षेचा उपाय म्हणून या क्षेत्राला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे.

( हेही वाचा: ग्राहकांसाठी झोमॅटोने पुन्हा सुरु केली ‘ही’ जुनी ऑफर )

निर्बंध काय?

  •  प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उप- पारंपारिक हवाई उड्डाणांवर दिल्लीत बंदी घातली आहे.
  • सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीत पॅरा- ग्लाइडर्स, पॅरा-मोटार, हॅंग ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राप्ट, हाॅट एअर बलून, लहान पाॅवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई वाहनांना परवानगी नसेल असे, आदेश दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here