पावसाळी पाणी वाहून नेणारे मुख्य मोठे नाले हे आरसीसी स्लॅबद्वारे बंदिस्त करण्याची मागणी होत असल्याने याप्रकारे नाल्यांचे स्लॅब आच्छादित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने धोरण बनवले जात आहे. उपायुक्त (पायाभूत सुविधा) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत या धोरणाचा मसुदा अंतिम केला जात असून हे धोरण निश्चित झाल्यानंतर सिमेंट काँक्रिटच्याद्वारे सर्व मोठे नाले आच्छादित केले जाणार आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निवाडयानुसार, हरियाणा राज्याच्या प्रमुख सचिव (नगर व प्रवेश) नियोजन खाते यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व गुरगाव महानगरपालिकेशी सल्लामसलत करून पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई करून, त्या बंदिस्त न करता स्वच्छ परिरक्षित करण्यात याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. या निवाड्याच्या प्रती संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण मंडळ आदींना पाठविण्याकरिता हरित लवादाने संबंधितांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील मुख्य नाले सिमेंट काँक्रिटच्या स्लॅबद्वारे आच्छादित करण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक धोरण बनवण्याच्या दृष्टीकोनातून याचा मसुदा बनवण्यात आला आहे.
(हेही वाचा सीमाभागातील तणावाला जबाबदार असणाऱ्या बनावट ट्विटर अकाउंटवर कारवाई करणार – अमित शाह)
महानगरपालिका प्रशासनाने नाले बंदिस्त करता येतील
तब्बल सात वर्षांपूर्वी तत्कालिन भाजपचे नगरसेवक दिलीप छेडा यांनी मुंबईतील मोठे नाले आच्छादित करण्याची मागणी केली होती आणि आच्छादित केलेल्या नाल्यांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याची मागणी केली होती. महानगरपालिका प्रशासनाने नाले बंदिस्त करता येतील अशारितीने उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. सध्या ऊजेच प्रश्न असताना सौर ऊर्जा (ग्रीन पॉवर) मिळण्यासाठी मुंबईतील लहान व मोठया नात्यांच्या ठिकाणी सौर उर्जेचे पॅनल बसविण्यासाठी मोठया प्रमाणात जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे गोलाकर सौर उर्जेचे पॅनल बसविण्यात यावेत. जेणेकरून, नाले बंदिस्त होऊन, त्यामध्ये कचरा टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीस आळा बसेल आणि मुबलक प्रमाणात सौरउर्जा (ग्रीन पॉवर) प्राप्त होईल, असे त्यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले होते.
काय म्हणतात अधिकारी?
मात्र, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहरातील सर्व नाले सौर उर्जेचे पॅनल बसवण्याकरता बंदिस्त करणे हे साफसफाईच्या दृष्टीने तसेच आर्थिकदृष्टया व्यवहार्य असेल असे वाटत नाही. परंतु, मुख्य नाले आर.सी.सी. स्लॅबद्वारे आच्छादीत करण्याबाबतच्या मसुदा धोरणासहच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानंतर सेवाभावी संस्था. गृहनिर्माण संस्था, महानगरपालिकेची विविध खाती, शासकीय इमारती, खाजगी भूधारक अथवा विविध शैक्षणिक संस्था विविध प्राधिकरणे अशा प्रकारचा स्वखर्चाचा प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाल्यास नाल्यावर सौरउर्जेसाठी पॅनल बसविण्याबाबतच्या प्रस्तावच्या तांत्रिक बाबी या धोरण अंतिम झाल्यानंतर यासाठी नेमलेल्या समितीद्वारे तपासून नाले सफाईस अडथळा निर्माण होणार नाही, याचा सखोल अभ्यास करून सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजूरी नंतर अशा प्रकारच्या प्रस्तावांचा विचार करता येवू शकेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community