येत्या काही वर्षांत Mumbai ची खरी ओळख नाहीशी होईल? बंगळुरू थिंक टँकचा अहवाल काय सांगतो?

165
येत्या काही वर्षांत Mumbai ची खरी ओळख नाहीशी होईल? बंगळुरू थिंक टँकचा अहवाल काय सांगतो?
येत्या काही वर्षांत Mumbai ची खरी ओळख नाहीशी होईल? बंगळुरू थिंक टँकचा अहवाल काय सांगतो?

‘स्वप्नांचे शहर’ म्हणून ओळखली जाणारी मुंबई (Mumbai) ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. समुद्रकिनाऱ्यांपासून बॉलीवूडपर्यंत, संग्रहालये आणि निसर्ग उद्यानांपासून धार्मिक स्थळांपर्यंत, प्रत्येकासाठी येथे काहीतरी आहे. मात्र, आता मुंबईकरांची चिंता वाढवणारे संशोधन समोर आले आहे. मुंबई पुढील 16 वर्षांत गायब होऊ शकते, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरू थिंक टँकच्या (Bangalore Think Tank) अहवालानुसार, 2040 पर्यंत मुंबईचा सुमारे 13.1% भाग समुद्रामध्ये बुडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबई शहरावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mumbai)

(हेही वाचा –MSBSHSE : अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर)

बंगळुरू थिंक टँकच्या अहवालातील माहितीनुसार, समुद्र पातळी वाढणे हे भारतीय किनारपट्टीवरील शहरांसाठी धोकादायक ठरत आहे. ज्यावर काम करणे अतिशय आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील डेटा शोधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. लेटेस्ट IPCCमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ग्लोबल ट्रेंडमध्ये या कंपनीने ऐतिहासिक कालखंडातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक कल पाहून अभ्यास केला आहे. उत्सर्जनामध्ये जीवाश्म इंधनाचा समावेश अधिक असल्याचे आढळून आले. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. (Mumbai)

(हेही वाचा –कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार; दिल्लीतील Doctor जाणार संपावर)

पाणी पातळी वाढल्यानंतर मुंबईसाठी मोठा धोका असल्याचे पर्यटन तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन लाइन्स यासारखी पर्यटन स्थळे पाण्यात बुडल्यास पर्यटकांची संख्या कमी होईलच पण मुंबईची ओळखही नाहीशी होऊ शकते. अशा पद्धतीने समुद्राची पातळी वाढल्याने पर्यटन उद्योगास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्यामागील कारण म्हणजे समुद्राजवळील नवीन इमारतींचे बांधकाम असू शकते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. याचे आगामी काळामध्ये दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. (Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.