- प्रतिनिधी
खासगी बँका नफा कमवण्यावर लक्ष केंद्रित करतात, पण मुंबई जिल्हा बँक सर्वसामान्य नागरिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे कार्य करत आहे, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी काढले. मुंबई बँकेच्या चुनाभट्टी शाखेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी या कार्यक्रमात प्रतिक्षानगर येथे दोन वर्षांत १०-१२ मजल्यांचे सहकार भवन उभारणार असल्याची घोषणा केली.
मुंबई बँकेच्या योगदानाची दखल
मुंबई बँकेने ६० हून अधिक शाखा उघडून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकार क्षेत्र लोकशाहीसाठी महत्त्वाचे असून, मुंबई बँक हे उत्तम उदाहरण असल्याचे नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितले. त्यांनी बँकेच्या स्वयंपुनर्विकास योजनेचेही कौतुक केले, ज्यामुळे गृहनिर्माण संस्थांना विकासकांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांना वर्षा निवासस्थानी जाण्यास भीती वाटते का?)
मुंबई बँकेची प्रगती आणि भविष्यातील योजना
आ. प्रविण दरेकर यांनी सांगितले की, बँकेचा व्यवसाय काही हजार कोटींवरून १५ हजार कोटींवर पोहोचला आहे. सर्वसामान्यांना सहकार्य करणारी ही बँक आणखी मोठी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, विधीमंडळातील ८५०-९०० कर्मचाऱ्यांची खाती मुंबई बँकेत उघडण्याचा आदेश देण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे सहकार भवनासाठी भूखंड मिळाला असून, दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचा निर्धार दरेकर यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्राला मिळणारे महत्त्व
देशपातळीवर सहकार क्षेत्राला पहिल्यांदाच अर्थसंकल्पात स्थान मिळाले असून, याचा फायदा शेतकरी आणि सहकारी संस्था यांना होणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community