मुंबईतील बेस्ट बसला (BEST Bus) शनिवारी (9 डिसेंबर) सकाळी आग (Fire) लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत व जीवितहानी झाली नाही. (Mumbai)
बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले. आर.टी. सांताक्रूझ डेपोची बस क्र. सी-1, बस क्र. 7891 सांताक्रूझ डेपोतून इलेक्ट्रिक हाऊसकडे जाणारी बस भायखळा स्थानक ते J.J. हॉस्पिटल दरम्यान सकाळी साडेआठ च्या सुमारास नागपाडा (Nagpada) सिग्नलजवळ बसला आग लागल्याची घटना घडली. (Mumbai)
(हेही वाचा : Railway : लांब पल्ल्याच्या गाड्या का धावतायेत उशिराने, काय आहे नेमके कारण)
ही आग बस टायरच्या उजव्या बाजूला आग लागली. कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग(Fire) विझवली. बस आग लागण्यापूर्वीच रिकामी करण्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. (Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community