176 खांबांवर कोस्टल रोडच्या पुलाचा भार!

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणा-या सागरी किनारा मार्गांतर्गत साधारणपणे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत.

‘कोविड १९’ सारख्या साथ रोगाचे आव्हान असतानाही या सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत तांत्रिकदृष्ट्या अनेक अत्याधुनिक व अभिनव बाबी राबविण्यात येत असून या अंतर्गत भारतात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन सागरी किनारा मार्गाचा भाग असणा-या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे. या दृष्टीने सुरुवातीला ३ चाचणी स्तंभांची उभारणी एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोस्टल रोडच्या पुलांचा भार एकखांबी वाहिला जाणार आहे.

पुलाखाली १७६ स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणा-या सागरी किनारा मार्गांतर्गत साधारणपणे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण लांबी १५.६६ किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणा-या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ (Group Pile) पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः ४ स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ (Mono-pile) पद्धतीमध्ये त्या ऐवजी खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. यानुसार सागरी किनारा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणा-या पुलांखाली १७६ स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.

(हेही वाचा : आता डीआरडीओ पुरवणार रुग्णालयांना ‘प्राणवायू’… अशी होणार ऑक्सिजन प्लांटची उभारणी)

बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागू शकला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या ७०४ वरुन १७६ इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here