Mumbai Boat Accident : अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी परवाना अखेर रद्द

52
Mumbai Boat Accident : अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी परवाना अखेर रद्द
Mumbai Boat Accident : अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी परवाना अखेर रद्द

घारापुरीजवळ (Elephanta Island) प्रवासी बोटीवर नौदलाची स्पीड बोट आदळून बुधवार झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या ‘नीलकमल’ बोटीला हा अपघात झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीअंतर्गत बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले. (Mumbai Boat Accident)

(हेही वाचा – Mumbai Goa Highway वर बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३४ प्रवासी बचावले)

याची गंभीर दखल घेत मुंबई सागरी मंडळाने (Mumbai Maritime Board) अखेर आता ‘नीलकमल’ बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र निलंबित केले आहे. तसेच बोटीतील डेकची जबाबदारी असणाऱ्या बोट मास्टर आणि इंजिनची जबाबदारी असणाऱ्या इंजिन ड्रायव्हरची चौकशी सध्या सुरू आहे. यांच्यावरही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याचा ठपका असून चौकशीअंती या दोघांविरोधातही कडक कारवाई करून त्यांचा परवाना प्रमाणपत्र निलंबित करण्याचे संकेत सागरी मंडळाने दिले आहेत.

‘नीलकमल’ बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने अपघात झाला. मात्र ‘नीलकमल’ बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ‘नीलकमल’ बोटीची प्रवासी क्षमता ८० प्रवासी आणि सहा कर्मचारी अशी होती. असे असताना या बोटीवर अपघातादरम्यान एकूण ११० प्रवासी आणि ५ कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असल्याने नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्व्हे प्रमाणपत्र बुधवारी निलंबित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai Boat Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.