विशेष प्रतिनिधी,मुंबई
पूर्वी मुंबईतील कानकोपऱ्यातील हिरवळीच्या ठिकाणी, बाग-बगीच्यामध्ये, अगदी रस्त्याच्या मधोमध असलेल्या वाहतुक बेटांवर असलेल्या फुलांच्या ताटव्यांवर अगदी सहजपणे दिसणारी फुलपाखरे (butterfly) आता जवळपास दिसेनाशी झाली आहेत. आणि हीच आपल्याला निसर्गाकडून देण्यात आलेल्या धोक्याची निशाणी आहे, अशा शब्दांत निसर्ग अभ्यासक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अविनाश कुबल (Senior environmental expert Avinash Kubal) यांनी वाढते प्रदुषण (Pollution) आणि त्यामुळे होणाऱ्या निसर्गाच्या हानीमुळे फुलपाखरांच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. (Mumbai Butterfly Festival)
चेंबूरच्या एन जी आचार्य उद्यानात मुंबई महानगरपालिकेच्या “एम-पश्चिम विभाग” आणि “विवांत अनटेम्डअर्थ फाउंडेशन” च्या वतीने ११-१२ जानेवारी दरम्यान भरविण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई फुलपाखरु महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्र “शहरी अधिवास आणि फूलपाखरांचे संवर्धन” च्या अध्यक्षीय भाषणाद्वारे संबोधित करताना निसर्ग अभ्यासक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ अविनाश कुबल यांनी मुंबईकरांना सावध केले.
बागबगीच्यामध्ये बागडणारी फुलपाखरे हे हवेच्या शुद्धतेचे प्रमुख निर्देशक
मुंबईकरांनो सावध व्हा, मुंबईतील प्रचंड वाढलेले हवेचे प्रदूषण तुमचे आयुष्य कमी करू शकते. रंगीबेरंगी फुलांवर भिरभिरणारी चित्ताकर्षक फुलपाखरे ही शुद्ध हवेचे प्रतीके आहेत. फुलपाखरांची घाटात चाललेली संख्या असे दर्शविते की हवेची शुद्धता कमी झाली आहे. रानावनात तसेच बागबगीच्यामध्ये बागडणारी फुलपाखरे हे हवेच्या शुद्धतेचे प्रमुख निर्देशक. त्यामुळे आजही ज्या ज्या ठिकाणी पर्यावरणाची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे अशा उत्तर- पूर्वेकडील राज्यात, पश्चिम घाटातील काही ठराविक पट्टयातून आपल्याला फुलपाखरांच्या बहुसंख्य प्रजाती सुखनैव बागडताना आढळून येतात.परंतु दुर्दैवाने मुंबई परिसरातील परिस्थिति आता तशी राहिली नाही असे घटत्या फुलपाखरांच्या संख्येवरून सांगता येईल, असे कुबल यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – तो दिवस दूर नाही जेव्हा भारत गरिबीमुक्त होईल; PM Narendra Modi यांचा विश्वास)
घटत चाललेली फुलपाखरांची संख्या हवेच्या वाढत्या प्रदूषणाचे निर्देशक
हवेच्या प्रदूषणामुळे वाढत असलेले विविध प्रकारचे आजार यामध्ये सामान्य सर्दी खोकल्यापासून ते डोकेदुखी, ताप, अंगदुखी, दमा, आणि पुढे जाऊन होणारे होणारे श्वसनमार्गाचा किंवा फफ्फुसाचा कॅन्सर सारखे गंभीर आजार यांचे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे जी हवा आपण श्वसनाद्वारे आपल्या शरीरात घेतो त्या हवेच्या प्रदूषणामध्ये. आपल्या आसपासच्या परिसरातून घाटत चाललेली फुलपाखरांची संख्या हवेच्या वाढत्या प्रदूषणाचे निर्देशक आहे. हवेमध्ये पसरणारे विविध प्रकारचे विषारी वायू, हवेमध्ये फवारली जाणारी विविध प्रकारची कीटकनाशके आणि सोबतच हवेमध्ये तरंगणारे धुलीकण हे हवेचे प्रदूषण वाढवणारे मुख्य घटक. अशी प्रदूषित हवा (polluted air) आपल्या फुफ्फुसांमध्ये गेल्यामुळे आपल्याला श्वसनमार्गाचे आजार आणि विकार होण्याची शक्यता बळावते ह्या सत्याकडे दुर्लक्ष करून आजिबात चालणार नाही अशा भयावह परिस्थितील आपण तोंड देत आहोत,असे म्हणाले.
(हेही वाचा –Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई )
हवेतील धुलीकण कमी करण्यासाठीची उपाययोजना
हवेची शुद्धता वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात ज्यामध्ये वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठीची उपाययोजना केली जाऊ शकते. विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांमधून बाहेर पडणारे विषारी पदार्थ तसेच कीटकनाशके इत्यादींच्यामुळे हवा प्रदूषित होऊ नये याकरिताची उपाययोजना सुद्धा केली जायला हवी. रस्त्यावरील वाहने आणि त्याद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारची उपाय योजनांना जर योग्य प्रतिसाद मिळाला तरच हवेचे प्रदूषण कमी होऊन त्याद्वारे मुंबईकरांचे अशा सर्व आजारांपासून संरक्षण होईल आणि त्यांचे आयुष्यमान वाढेल, असे प्रतिपादन अविनाश कुबल (Avinash Kubal) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community