Mumbai Cement Concrete Road : दुसऱ्या टप्प्यातील ४०० किमी अंतराच्या निविदा जारी; जुन्या पारंपारिक कंत्राटदारांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट

मुंबईत सध्या सुमारे ४०० रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कामे सध्या सुरु असतानाच आता दुसर्‍या टप्प्यात ४०० किमी अंतरातील २०० हून अधिक रस्ते  कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तब्बल ६ हजार ३०० कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

1450
Cement Concrete Road : वांद्रे पश्चिम रंगशारदा परिसरातील रस्ते अडकले वादात?, निविदा प्रक्रियेवर संशय

मुंबईत सध्या सुमारे ४०० रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कामे सध्या सुरु असतानाच आता दुसर्‍या टप्प्यात ४०० किमी अंतरातील २०० हून अधिक रस्ते  कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तब्बल ६ हजार ३०० कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदेमध्ये उपकंत्राट देण्याची अट मान्य करण्यात यावी अशाप्रकारची मागणी मुंबई महापालिकेतील पारंपारिक कंत्राट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू आणि रस्ते प्रमुख अभियंता मनिष पटेल यांची भेट घेऊन केली. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपकंत्राट देण्यास किंवा वॉर्ड निहाय कंत्राट देण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच मोठ्याप्रमाणात रस्ता सिमेंट काँक्रिटची कामे मोजक्याच कंपनीला देऊनही त्यांची कामे होऊ शकली नाही, हा अनुभव लक्षात घेऊनही प्रशासनाला दुसऱ्या टप्प्यातील रस्ते कामांच्या निविदेत कोणताही बदल करावासा वाटत नाही, मग या रस्त्यांची कामे गतीशिल व्हावी असे प्रशासनाला वाटत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. (Mumbai Cement Concrete Road)

पहिल्या टप्प्यातील कामांची काय आहे परिस्थिती

राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी मुंबईतील रस्ते हे खड्डेमुक्त करण्यासाठी आणि सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत सुमारे ६०८० कोटी रुपयांचे कंत्राट पाच कंपन्यांना मंजूर करून दिले. मात्र जानेवारी २०२३मध्ये या कामांना मंजुरी दिल्यानंतर ९१० रस्त्यांच्या कामांपैंकी १२३ कामे सुरू झाली असून उर्वरित ७८७ कामांना सुरूवात झालेलीही नाहीत. आतापर्यंत म्हणजे जानेवारी २०२४ पर्यंत ११ कामे पूर्ण झाली आहेत, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी नमुद केले. दरम्यान, शहर भागाच्या कामांसाठी नेमलेल्या कंत्राट कामाच्या मेसर्स रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदाराला देण्यात आले होते. पण त्यांनी नियोजित वेळेत काम सुरू न केल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ६४ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या या शहर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी मागील आठवड्यात १,३६२ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. (Mumbai Cement Concrete Road)

(हेही वाचा – UPA vs NDA : लोकसभेत युपीए सरकारची श्वेतपत्रिका सादर; कॉंग्रेसमध्ये खळबळ)

महापालिकेतील पारंपारिक कंत्राटदारांची काय मांडले म्हणणे

मात्र, पहिल्या टप्प्यातील कामांची वर्ष उलटून गेली तरी दहा टक्के प्रगती नसताना आता प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट कामांसाठी निविदा मागवल्या आहे. यामध्ये उपनगरातील तीन परिमंडळांसाठी प्रत्येकी एक आणि शहर व पूर्व उपनगरासाठी प्रत्येकी एक अशाप्रकारे एकून पाच निविदांच्या जाहिराती प्रसिध्द केल्या आहे. पहिल्या टप्प्यातील कामांच्या अटींप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील निविदांमध्ये अटी असल्याने मुंबई महापालिकेतील रस्त्यांची कामे करणाऱ्या सर्व पारंपारिक कंत्राट कंपन्यांनी महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू आणि रस्ते प्रमुख अभियंता मनिष पटेल यांच्यासोबत बैठक घेऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये किमान उपकंत्राट देण्याची अट घालण्यात यावी अशीही विनंती केल्याची माहिती मिळत आहे. परंतु महापालिका प्रशासनाने कंत्राट कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेतले, पण आपल्याला यात काहीच करता येत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Cement Concrete Road)

पुढील दहा वर्षांच्या एकदाच निविदा मागून टाका मग

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, रस्त्यांचा विकास व्हायला हवा. पण आधीच सहा हजार कोटींच्या कामांपैकी दहा टक्केही काम पूर्ण होत नाही आणि दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या जात आहे. मग प्रशासनाने पुढील दहा वर्षांच्या सर्व रस्ते विकास कामांच्या निविदा एकदाच मागून टाकायच्या आणि महापालिकेची तिजोरी एकदम खाली करून टाकायची. चहल यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करता येत नाही, महसूल वाढवण्याचा प्रयत्न करता येत नाही आणि हजारो कोटींची कामे ते हाती घेत आहे. (Mumbai Cement Concrete Road)

(हेही वाचा – Pradeep Sharma : माजी आमदार आणि माजी चकमक फेम पोलीस अधिकारी यांच्या घरी आयकर विभागाचे छापे)

पालिकेच्या अखत्यारित रस्ते : २०५० किमी

आतापर्यंत झालेले काँक्रिटीकरण : १२२४ किमी

दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटच्या कामांचा अंदाजित खर्च

शहर : ११४२ कोटी ४ लाख

पश्चिम उपनगर

परिमंडळ ३ : वांद्रे पूर्व आणि पश्चिम, अंधेरी पूर्व

८६४ कोटी २७ लाख

परिमंडळ ४ : अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड

१५६६ कोटी ६५ लाख

परिमंडळ ७ :  कांदिवली, बोरिवली, दहिसर

१४०० कोटी ७३ हजार

पूर्व उपनगर

सुमारे  १३०० कोटी रुपये (Mumbai Cement Concrete Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.