विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील दमट वातावरण तसेच वाहतूक कोंडी यासारखी आव्हाने पाहता अधिकाधिक रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याची सूचना मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची अत्युच्च दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन या सर्व बाबींच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अभियंत्यांसोबत विचारमंथन करण्यासाठी पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) येथे एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळा शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याच्या शुभारंभ प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी हे उपस्थित होते.
अतिरिक्त आयु्क्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. के.व्ही. कृष्णराव, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) मनिषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्ते कामांमध्ये नियुक्त अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५० हून अधिक महानगरपालिका अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांचा या कार्यशाळेमध्ये सहभाग होता.
(हेही वाचा – Global Warming: हिंदी महासागर वेगाने तापतोय, भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसणार)
मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत
मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची (Mumbai Cement Concrete Road) कामे करताना निर्माण होणारी आव्हाने, याबाबत महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी कार्यशाळेदरम्यान विचार मांडले. सिमेंट कॉंक्रिट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूक कोंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने असल्याचे अभियंत्यांकडून नमूद करण्यात आले. त्यासोबत वाहतूक कोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. रस्त्याची कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी तसेच मुंबई महानगरात असणारे मॅनहोल्सचे जाळे हीदेखील विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यासाठीची आव्हाने असल्याचा अभिप्राय अभियंत्यांनी दिला.
अभियंत्यांसोबत विचारमंथन करणारी कार्यशाळा
या प्रसंगी बोलतांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेसारखी (BMC) मोठा गौरवशाली इतिहास आणि प्रदीर्घ अनुभव असलेली नागरी संस्था आणि आयआयटी मुंबईसारखी प्रतिष्ठित संस्थेमार्फत संयुक्तपणे मुंबई महानगरासाठी सर्वोत्तम नागरी उपाययोजना करणे, ही आजची गरज आहे. महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी अभियंत्यांसोबत विचारमंथन करणारी कार्यशाळा देखील त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, असे गगराणी यांनी सांगितले. ते म्हणाले मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी सेवा सुविधांचा एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे रस्ते अत्युच्च गुणवत्तेचे असणे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणून आयआयटी मुंबई सारख्या संस्थेकडून अभियंत्यांसोबत विचारमंथन करून, केले जाणारे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.
(हेही वाचा – Firing in Kashmir: काश्मिरात २ ठिकाणी गोळीबार, व्हिलेज डिफेन्स गार्डचा सदस्य जखमी)
सिमेंट काँक्रिटचे रस्ते अधिक वर्षे टिकून रहावे,
मुंबईत सिमेंट कॉंक्रिट रस्ते (Mumbai Cement Concrete Road) प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. कोणताही प्रकल्प बांधताना त्यामध्ये गुणवत्तेबाबत आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते. त्यासाठी प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या घटकांसोबत चर्चा करून विचारमंथन होणे आवश्यक ठरते, जेणेकरून अडचणी असल्यास त्या योग्यरीत्या सोडवता येतात. हाच विचार नजरेसमोर ठेवून ही विचारमंथन कार्यशाळा होत असून त्याचा नक्कीच फायदा होईल. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण केल्यानंतर त्याचे आयुर्मान १० वर्षांच्या दोषदायित्व कालावधी (DLP) पुरते मर्यादीत न राहता किमान २० पेक्षा अधिक वर्षे टिकून रहावे, अशा दृष्टीने नियोजन करून ही रस्ते बांधणी होणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेतील विचारमंथनाचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community