मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील भिगवण ते वाशिंबे दुहेरीकरणाच्या कामासाठी ६०० मजुरांनी २८.४८ किमी दुहेरीकरणाचे काम पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावरून १२० किलोमीटर प्रति तास वेगाने आता रेल्वे एक्स्प्रेस गाड्या धावणार असल्याते रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई ते चेन्नई सुपरफास्ट प्रवास
या मार्गावर भिगवण, जिंती रोड, पारेवाडी आणि वाशिंबे या स्थानकाचा समावेश आहे. उजनी धरणातील ४१ छोटे पूल आणि ३ मोठे पूल समाविष्ट असल्याने हा विभाग महत्त्वाचा होता. २५ जुलैपासून हे काम सुरू झाले आणि ९ ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ८ आणि ९ ऑगस्ट रोजी या कामाची पाहणी केली. तपासणी दरम्यान, शैलेश गुप्ता, मनोज शर्मा, रजनीश माथूर, दिनेश कटारिया, चंद्रभूषण, आनंद स्वरूप आदी उपस्थित होते.
( हेही वाचा : Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; आता ‘या’ नागरिकांना होणार नाही योजनेचा फायदा…)
या कामामुळे सोलापूर विभागातील सर्वच गाड्यांचा वेग वाढणार आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल. भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी झाला या मार्गावरील प्रवास आता सुपरफास्ट झाला आहे.
Join Our WhatsApp Community