मुंबईत वादळी वाऱ्यांसह पाऊस

मुंबई परिसरात बुधवार सकाळपासून पाऊस सुरू आहे. सायंकाळी आठ वाजता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात 40-50 ते 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. हा प्रभाव दोन दिवस राहणार असल्याने गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशीही मुंबईत जोरदार वारे वाहणार आहेत.

दिवसभरातील पावसाची नोंद

सायंकाळी आठपर्यंत दिवसभरात झालेल्या पावसाच्या नोंदीत सांताक्रूझ वेधशाळा केंद्रात 18.8 मिमी पाऊस पडला तर कुलाब्यात 7 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या प्रभावाने किमान तापमान 24.3 अंश सेल्सिअसपर्यंत तर कमाल तापमान 27.7 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली.

( हेही वाचा : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीतून उद्धवसेना बेदखल)

दिवसभरात परळ ते मलबार हिल परिसरात पावसाची संततधार सुरु होती. बुधवारी गेल्या 12 तासात वडाळा अग्निशमन केंद्रात सर्वात जास्त 39.35 मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभरात मुंबई महानगर पालिका मुख्यालयात 21.08 मिमी, मलबार हिल येथे 26.91 मिमी, ग्रॅण्ट रोड परिसरात 29. 44 मिमी, बी वोर्ड परिसरात 28.66 मिमी, परळ येथे 30.45 मिमी पाऊस पडला. चेंबूरच्या टाटा पॉवरपरिसरात 33.5 मिमी देवनार येथील पालिका कार्यालयात 20.57 मिमी, विद्याविहारला 24 मिमी पावसाची नोंद झाली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here