NCMC System : मुंबईकरांना एकाच तिकिटावर करता येणार बेस्ट, मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वेने प्रवास

मुंबईत दैनंदिन प्रवास करण्यासाठी सामान्य नागरिक बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वेसेवेचा वापर करतात. या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्यासाठी एकाच तिकिटाचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची योजना (NCMC) आखली होती. आता पुढील वर्षापासून मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात ही प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ पदार्थांवरील सेवाशुल्क रद्द; जेवण स्वस्त होणार की महागणार?)

एकात्मिक तिकीट प्रणाली योजना ( National Common Mobility Card )

बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे प्रवासासाठी एकच तिकीट असावे यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली ही योजना आखण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचा वेळ, खर्च तसेच प्रवासी लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचू शकतात हा यामागील उद्देश आहे.

बेस्ट उपक्रमाने साधारण ३ ते ४ महिन्यांपूर्वी एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी केली असून यासाठी प्रवाशांना कार्ड वाटप सुद्धा करण्यात आले आहे. परंतु रेल्वे, मेट्रो, मोनो या सेवांमध्ये ही एकात्मिक तिकीट प्रणाली अद्याप उपलब्ध नसल्याने बेस्टच्या या सेवेला अल्प प्रतिसाद मिळत आहे. या सेवेची अंमलबजावणी पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेतही लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी MRVC ने साधारण अडीच महिन्यांपूर्वी तांत्रिक आणि आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

कार्ड रिडरवर तिकीट 

या योजनेनुसार सर्व रेल्वे स्थानकांमध्ये कार्ड रिडर बसवण्यात येणार आहेत. प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या कार्ड रिडरवर टॅप करत आपले तिकीट काढावे लागणार आहे. प्रवासानुसार या कार्डमधून पैसे वजा केले जातील. आपल्या सोयीनुसार तुम्ही या कार्डमध्ये रिचार्ज करू शकता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here