BMC : दरदिवशी तीन मजल्याच्या इमारतीएवढा कचरा करतात मुंबईकर

1432
BMC : दरदिवशी तीन मजल्याच्या इमारतीएवढा कचरा करतात मुंबईकर
  • सचिन धानजी, मुंबई 

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडवर केली जात असली तरी कोणालाही डंपिंग ग्राउंड नको असते. मुंबईच काय तर महाराष्ट्रातही डंपिंग ग्राउंडबाबत तक्रार नाही असे होणार नाही पण मुंबईतील कचऱ्याची जर आपण माहिती घेतली तर लक्षात येईल की, दरदिवशी मुंबईमध्ये सुमारे ७ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. सात हजार म्हटल्यावर नक्की कल्पना येणार नाही. पण हा एवढा कचरा म्हणजे तीन मजल्यांची इमारत तयार होऊ शकते एवढा असतो. वर्षाला एक हजार मजल्याच्या इमारती एवढा कचरा मुंबईत गोळा होतो. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आता कांजूरमार्ग येथेही वीज निर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी यांनी दिली. (BMC)

देवनारमध्ये ३० ते ४० मीटर कचऱ्याचे डोंगर!

दादर येथील अमर हिंद मंडळाच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत बोलताना डॉ. भूषण गगराणी यांनी मुंबईत दरदिवशी ६५०० ते ७००० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा दरदिवशी निर्माण होणारा कचरा म्हणजे दररोज तीन मजल्याची इमारत तयार होऊ शकते एवढा असतो. म्हणजे वर्षाला हजार मजल्याची इमारत तयार होऊ शकते एवढा कचरा निर्माण करतो. आज देवनार डंपिंग ग्राउंड ही १९२० सुरू करण्यात आले. आज तिथे तीस ते चाळीस मीटर उंचीचे डोंगर तयार झालेले आहेत. तसेच गोराई, मुलुंड डंपिंग ग्राउंड बंदच झाले आहेत. आता कांजूरमार्ग एकमेव सुरू आहे. (BMC)

(हेही वाचा – Honor Killing Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात हिंदू युवकाशी लग्न करणाऱ्या मुसलमान मुलीचा संशयास्पद मृत्यू; ऑनर किलिंगचा संशय)

नागरिकांच्या तक्रारी नाही असे होणार नाही!

मुंबईतच काय तर महाराष्ट्रातच कुठेही अशी डंपिंग ग्राउंड नाही की, नागरिकांच्या तक्रारी नाही आहेत. डंपिंग ग्राउंड म्हटले की, काही प्रमाणात वास येणारच. मग तिथे भटकी कुत्री आणि इतर जनावरे येणारच. या गोष्टी टाळता येण्यासारख्या नाहीत. त्याच्यावर उपाय म्हणजे जो काही घनकचरा गोळा होता, तो लँडफिल पद्धतीने महापालिका साठवत असते, त्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करत असते. त्याचे रुपांतर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे गॅस, वीज निर्मिती करणे अशा गोष्टी कराव्या लागतील, असे गगराणी यांनी स्पष्ट केले. (BMC)

लोकवस्तीजवळ डंपिंग ग्राउंड बांधले की, लोकवस्ती तिथे वसली

देवनार, गोराई वा कांजूरमार्ग ही आम्ही लोकांच्या वस्तीमध्ये घनकचरा केंद्र तयार केले की, घनकचऱ्याच्या जवळ लोकांची वस्ती आहे. हा पण महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचशा औद्योगिक क्षेत्राच्या जवळ वस्ती केली आहे. औद्योगिक क्षेत्र पूर्वी होते तिथेच आहेत. पण शेवटी आपणही बघितले पाहिजे की, काही जुने लोकही असतीलही तिथे राहायला. पण आपली मानवी वस्ती ही काही कारणांमुळे तिथे वसली गेली. पण आपण तिथे गेलो आणि आपला त्रास वाढत चालला आहे. (BMC)

(हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू, रचिल रवींद्राला टाकलं मागे)

कचरा विल्हेवाटीसाठी वीज निर्मिती शिवाय पर्याय नाही!

हे सगळे सांगितल्यानंतरही घनकचरा साठवून ठेवणे हे आपल्याला आधुनिक विचारसरणींमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये बसत नाही. त्यामुळे या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे रुपांतर हे विजेमध्ये करणे हे याशिवाय पर्याय नाही. मुंबई महापालिका आता त्यादृष्टीने विचार करते आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. लवकरच प्रयत्न करणार आहोत, तसा देवनारला कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ६०० टीडीपी चा प्रकल्प बांधून तयार होत आहे. दोन महिन्यात तो कार्यान्वित होईल. त्यातून महापालिका वीज निर्मिती करणार आहे. तसाच एक प्रकल्प कांजूरमार्गला करावा लागेल, असेही गगराणी यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.