Mumbai Climate Change : मुंबईकरांवर बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

106
Mumbai Climate Change : मुंबईकरांवर बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ
Mumbai Climate Change : मुंबईकरांवर बदलत्या वातावरणाचा परिणाम; सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ

कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे (Climate Change) नागरिकांवर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे.तसेच घरोघरी सर्दी (cold), खोकला (cough) आणि ताप (fever),घसा खवखवणे, डोकेदुखी तसेच अंगदुखी अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रामुख्याने दिसत आहेत. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये (Public Hospital) अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. (Mumbai Climate Change)

मिळालेल्या माहितीनूसार, मुंबईत दिवसा ऊन तर रात्री पाऊस यामुळे होणाऱ्या त्रासाला मुंबईकर हैराण आहेत. मात्र, यावेळी मुंबईत लक्षणांची तीव्रता अधिक दिसत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये या स्वरूपाच्या तक्रारी वाढत आहेत. अनेकदा खोकला किंवा सर्दीचा त्रास अंगावर काढला जातो, त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र त्यामुळे तो बळवतो. या पार्श्वभूमीवर, दमा किंवा श्वसनविकार असलेल्या रुग्णांना अधिक काळजी घेण्याची गरज असते.

(हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई , २१ Bangladeshi Infiltrators ना अटक)

 जुन्या चिठ्ठीवर पुन्हा तीच औषधे घेऊ नका – डॉक्टरांचा आग्रह 

वातावरणातील कोणत्याही स्वरूपाचा बदल हा त्यांच्या प्रकृतीसाठी अधिक चिंताजनक असतो. खोकला किंवा सर्दीचा त्रास सुरू झाला की, काही रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नेब्युलायजर किंवा त्वरित दिलासा देणारी औषधे घेतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज कोणीही अशी औषधे घेऊ नयेत. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या जुन्या चिठ्ठीवर पुन्हा तीच औषधे घेऊ नयेत, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. सर्दी, खोकला तसेच डोकेदुखीचा त्रास पुन्हा पुन्हा होत असेल किंवा वातावरणातील बदलामुळे हा त्रास होत असेल, तर वेळीच अलर्जीची चाचणी करून घ्यावी, असा आग्रह डॉक्टरांनी धरला आहे.’ (Mumbai Climate Change)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.