नव्या वर्षात Coastal Road चा पहिला टप्पा होणार सुरु

355

मुंबईत सध्या बहुप्रतिक्षेत असलेला कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात सुरु होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा हा पहिला टप्पा आहे. कोस्टल रोड सुरु झाल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान सोहळ्यात बोलत होते.

महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, सगळ्यात जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट आजच्या काळात महाराष्ट्रात आहेत. पूर्वीच्या काळात सगळे बंद करण्यात आले होते, आमचे सरकार आल्यावर सगळे प्रकल्प सुरू झाले. कोस्टल हायवे जानेवारीच्या अखेरपर्यंत सुरु होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान सुरु होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी पुढील टप्पा सुरु होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा CSR जर्नल एक्सलेन्स पुरस्कार वितरण सोहळा 2023 मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(हेही वाचा Padgha-Borivali NIA Raid : एनआयएचे सिक्रेट ऑपरेशन ‘पडघा-बोरिवली’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.