मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. मुंबई हे सतत बदल स्वीकारणारे शहर आहे. या शहरामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलेले आहे. शिक्षण, व्यापार, आरोग्य, चित्रपटसृष्टी, पर्यटन यामध्ये अग्रेसर असलेले महानगर आता मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे अधिक विकसित होणार यात शंका नाही. येथील प्रगत अभियांत्रिकी आणि कुशल कामगारांमुळेच मुंबई किनारी रस्त्यासारखा महाकाय प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याचे गौरवोद्गार इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी काढले. (Mumbai Coastal Road)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (Mumbai Coastal Road) काम सुरू आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव १२ फेब्रुवारी २०२४) भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत इस्त्राईलचे पदाधिकारी आणि अभियंते यांच्यासह महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता एम. एम. स्वामी, इस्त्राईल दुतावासातील राजकीय संबंध व विशेष उपक्रम विभागाचे अनय जोगळेकर यांच्यासह किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, कामगार उपस्थित होते. (Mumbai Coastal Road)
(हेही वाचा – Bihar : नितीश सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव )
मिरी रेगेव्ह यांनी हाजी अली येथील आंतरमार्गिका (इंटरचेंज), प्रियदर्शनी पार्कपासून ते पारसी जिमखान्यापर्यंत भूमिगत बोगद्याची पाहणी केली. रेगेव्ह म्हणाल्या, मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा दळणवळणासाठी योग्य वापर केला आहे. कामाची गुणवत्ता अनुकरणीय असून, उड्डाणपूल, भूमिगत बोगदे, त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा यांचा समावेश हे सर्व कौतुकास पात्र आहे. गत काही वर्षांपासून मुंबईसह भारतात पायाभूत सुविधांची अनेक मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांची भव्यता आणि स्थापत्य अभियांत्रिकी हे संपूर्ण जगासाठी दीपस्तंभ ठरतील, यात शंका नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Mumbai Coastal Road)
कामगारांवर उधळली स्तुतिसुमने-
मिरी रेगेव्ह यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठिकाणी कामगारांशीसोबत संवाद साधला. ‘तुमच्या हातांनी प्रचंड मोठे काम केले आहे. भविष्यात आमच्या देशाला तुमची गरज भासेल. अशाप्रकारचे भव्य प्रकल्प उभारण्यासाठी आम्हाला नक्की सहकार्य करा’, अशा शब्दात त्यांनी कामगारांची पाठ थोपटली. तसेच काही कामगारांसोबत सेल्फीदेखील घेतले. (Mumbai Coastal Road)
नरिमन हाऊसला दिली भेट-
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कुलाबा परिसरातील नरिमन हाऊस येथे असलेल्या निष्पाप नागरिकांचा जीव गेला. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सैनिकांपैकी काहींना वीरमरण आले. इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी नरिमन हाऊस येथे भेट देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Mumbai Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community