Mumbai concrete road : शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाला केली नाही सुरुवात, कंत्राटदाराला बजावली  नोटीस 

229
Mumbai concrete road : शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाला केली नाही सुरुवात, कंत्राटदाराला बजावली  नोटीस 
Mumbai concrete road : शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाला केली नाही सुरुवात, कंत्राटदाराला बजावली  नोटीस 
मुंबईतील ३९७ किलोमीटर अंतराच्या एकूण ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणा (Mumbai concrete road) करीता महापालिकेने जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश दिला असला तरी शहर भागातील कामांना सुरुवातच  झालेली नाही.  त्यामुळे शहर विभागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. मात्र,तिथेही लवकरच काम सुरु करण्यात येईल,असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महानगरपालिका प्रशासनामार्फत रस्ते सुधारणांसाठी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटकरण (Mumbai concrete road) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईतील ३९७ किलोमीटर अंतराच्या एकूण ९१० रस्त्यांचे काँक्रिटीकरणा करीता जानेवारी २०२३ मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. ही  कामे  करण्यासाठी पाच मोठ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून काही रस्त्यांची कामे ही प्रगतिपथावर आहेत.

(हेही वाचा –Yamaha MT 03 : यामाहाच्या या नवीन स्ट्रीट बाईकची किंमत पाहिलीत का?

यामध्ये मुंबईतील पश्चिम उपनगरात एकूण ९६ ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील ८३ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत व १३ ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर आहे. लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे रस्ते विभागाने स्पष्ट केले आहे.
तर पूर्व उपनगरात एकूण २७ ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील १९ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत. ८ ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर असून लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल. तर शहर विभागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. तिथेही लवकरच काम सुरु करण्यात येईल,असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबईतील रस्ते दर्जेदार बनवण्यासाठी महानगरपालिकेचा सातत्याने प्रयत्न असतो. या कॉंक्रिट रस्त्यांमुळे (Mumbai concrete road) मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार असून यंदा पावसाळ्यातही प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेत देखभालही करण्यात आल्याचे  प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.