कोरोनाबाधित आहात तर परस्पर खाजगी रुग्णालयात जाऊ नका! कारण…

कोविड झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात भरती करण्यापूर्वी आता मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचनाही मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांची लूटमार होऊ नये म्हणून पालिकेकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णाकडून पैसे उकळण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो तसेच, रुग्णाच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

…तर लाॅकडाऊन अटळ

देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला, तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

( हेही वाचा: तुम्हाला माहितीये का? यापूर्वीही बऱ्याचदा झाली पंतप्रधानांची सुरक्षा भंग! )

वाढती रुग्ण संख्या चिंताजनक

सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्ण संख्येची समोर येणारी आकडेवारी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजार 166 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here