कोविडचा आकडा तिनशेच्या आतच

97

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचा वाढलेला आकडा आता पुन्हा तिनशेच्या आत आलेला पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात ३१ हजार २८० कोविड चाचणी केल्यानंतर एकूण २९३ बाधित रुग्ण आढळून आले. तर ३२९ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात जिथे २७ हजार १८५ चाचणी करण्यात आल्यानंतर २७६ बाधित रुग्ण आले होते. तिथे मंगळवारी ३१ हजार २८० चाचणी केल्यानंतर २९३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात विविध जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ४ हजार १०१ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहे.

(हेही वाचा-जनाब राऊत तुम्हाला नबाव मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप)

मुंबईत दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन रुग्ण हे दिर्घकालीन आजारी होते. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३ रुग्ण पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. पाचही रुग्णांचे वय हे ६० वर्षाच्या वर होते. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के एवढा एवढा असून मागील आठवड्यात मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा ०.०५टक्के हा आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १३६८ एवढा आहे. मुंबईतील झोपडपट्टी व चाळींमधील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावरच असून इमारतींची संख्या ४३ एवढी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.