मुंबईतील रुग्ण संख्या पुन्हा वाढली!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा १७६ दिवसांवर आला आहे.

मुंबईतील कोरेानाबाधित रुग्णांचा कमी झालेला आकडा पुन्हा वाढला आहे. मंगळवारी १,७१७ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी, १२ मे रोजी २,११६ रुग्ण आढळून आले. तर ६६ रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी दिवसभरात एकूण ३३ हजार ४९९ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तर ४ हजार २९३ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर रुग्णांच्या आकडा पुन्हा वाढला आहे. मंगळवारी जिथे १,७१७ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी २,११६ रुग्ण आढळून आले.

(हेही वाचा : नालेसफाईच्या कामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस नाराज!)

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा १७६ दिवसांवर आला!

सोमवारी जिथे मृतांचा आकडा ७४ एवढा होता. तर मंगळवारी मृतांचा आकडा ५१ एवढा होता, बुधवारी मृतांचा आकडा हा ६६ एवढा होता. यामध्ये ३६ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये ३५ पुरुष आणि ३१ महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील दोन रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ३७ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २७ एवढी होती. मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९२ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा १७६ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ४४४ इमारती सील तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ८० एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here