मुंबईतील रुग्ण संख्या मागील चार दिवसांपासून नियंत्रणात येत असून शनिवारी दिवसभरात ७३३ रुग्ण आढळून आले, तर तेवढेच अर्थात ७३२ रुग्ण बरे होवून घरी परतले. संपूर्ण दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी १८ रुग्णांचा मृत्यू
शनिवारी दिवसभरात ७३२ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २९ हजार १७४ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शनिवारपर्यंत १५ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सरु आहेत. शनिवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १२ पुरुष आणि ०६ महिला रुग्णांचा समावेश होता. यामध्ये ४० वर्षांखाली ०४ रुग्णांचा समावेश आहे. तर ६० वर्षांवरील ०९ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ०५ एवढी होती.
(हेही वाचा : आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७१ ऑक्सिजन निर्मिती प्लांट!)
मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ६३३ दिवसांवर!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ६३३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ९५ इमारती सील तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही २१ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community