मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी अधिक होत असतानाच शुक्रवारी दिवसभरात जिथे ९२९ रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी दिवसभरात १,०४८ रुग्ण आढळून आले. तर शनिवारी दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा आकडा कमी होताना दिसत आहे.
मुंबईत २७ हजार ६१७ सक्रिय रुग्ण!
शनिवारी दिवसभरात १ हजार ३५९ रुग्ण बरे होवून घरी परतले. शनिवारपर्यंत संपूर्ण मुंबईत २७ हजार ६१७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू होता. शुक्रवारी जिथे ३० रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शनिवारी २५ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये १५ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. तर यामध्ये १५ पुरुष आणि १० महिला रुग्णांचा समावेश होता. तर चाळीशीच्या आतील ०३ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील १३ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ०९ एवढी होती.
(हेही वाचा : शीव रुग्णालयातील महानगर रक्तपेढीची जागा महापालिकेच्या ताब्यात)
रुग्ण दुपटीचा दर हा ३९९ दिवसांवर!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३९९ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १७२ इमारती सील तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ४० एवढी आहे.
Join Our WhatsApp Community