मुंबईत रुग्णवाढीचा उच्चांक : दिवसभरात ८,६४६ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू!

रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा बनली आहे.

मुंबईत मागील दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा निर्देशांक घटलेला असतानाच गुरुवारी, 1 एप्रिल रोजी रुग्ण संख्येने उसळी घेत तब्बल ८,६४६ रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात सुमारे साडेआठ हजार रुग्ण संख्या झाल्याने मुंबईकरांच्या उरात धडकी भरली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसांमध्ये बुधवारी, ३१ मार्च रोजी ५,३९० रुग्ण संख्येच्या तुलनेत गुरुवारी ८,६४६ रुग्ण संख्या म्हणजे तब्बल सव्वा तीन हजारांनी संख्या वाढलेली आहे. तर मृत्यूचा आकडाही गुरुवारी १८ एवढा झाला आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या  ५५,००५ वर पोहोचली

मुंबईमध्ये गुरुवारी ८,६४६ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ५,०३१ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर गुरुवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या ५५,००५ वर पोहोचली आहे. दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांपैकी १४ रुग्णांना दिर्घकालिन आजार होते. यामध्ये १२ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. मृत्यूचा आकडा आता वीसच्या दिशेने पुढे सरकू लागला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला!

दिवसभरात ४६ हजार ७५८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ५,३९४ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारपर्यंत ८० झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन झाले असून कंटेन्मेंट इमारतींची संख्या ६५० एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरी पार झालेला असतानाच आता तो ४९ दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचा : दादर, माहिमने गाठली शंभरी!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here