धावत्या लोकलमधील थरारक घटना; दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न

93

सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये या दिव्यांग प्रवाशाचा डावा हात पूर्णपणे होरपळला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयामध्ये पुढील उपचार सुरू आहेत.

( हेही वाचा : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! फुटबॉल खेळण्यासाठी आईचा आधार)

पोलीस केईएम रुग्णालयात दाखल

प्रमोद वाडेकर ( वय ३५ ) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, वाडेकर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमध्ये दिव्यांगांच्या राखीव डब्यातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान लोकल कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान येताच एका गर्दुल्याने नशेसाठी वापरणारे सोल्युशन रुमालावर टाकून त्याला आग लावली आणि हाच जळता रुमाल गर्दुल्याने अंगावर फेकल्याने प्रमोद वाडेकर यांचा डावा हात संपूर्णपणे होरपळला.

या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस केईएम रुग्णालयात दाखल झाले. जखमीने केलेल्या वर्णानुसार आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पंढरी कांदे यांनी दिली आहे. हल्ला करणाराही दिव्यांग असून हल्ल्यानंतर हा व्यक्ती मुंब्रा स्थानकात उतरून गेला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.