Central Railway : सीएसएमटी’ स्थानकात फलाट विस्तारीकरणाचे काम जलदगतीने

हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे

162
Central Railway : सीएसएमटी’ स्थानकात फलाट विस्तारीकरणाचे काम जलदगतीने
Central Railway : सीएसएमटी’ स्थानकात फलाट विस्तारीकरणाचे काम जलदगतीने

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० ते १४ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या फलाटांवर १२ ते १८ डब्यांच्या एक्स्प्रेस उभ्या राहू शकतात. मात्र फलाटांची लांबी वाढविल्यानंतर तेथे २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहू शकणार आहे. फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के कामे पूर्ण झाले आहे. हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Central Railway)

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकत नाही. त्यामुळे मुंबई – पुण्यादरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविता आलेली नाही. रेल्वेगाडीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांचे विस्तारीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सीएसएमटीच्या फलाट विस्तारीकरणाचे काम वेगात सुरू आहे. फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण मार्च अखेरीपर्यंत होईल. त्यानंतर उर्वरित फलाटांची कामे हाती घेण्यात येतील.या प्रकल्पासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

(हेही वाचा : Western Railway : ब्लॉक संपला, सोमवारपासून पश्चिम रेल्वे रुळावर)

पश्चिम रेल्वेवरील १७ अतिरिक्त वातानुकूलित लोकल

पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त १७ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर सोमवारपासून एकूण ९६ वातानुकूलित फेऱ्या होणार आहेत. मात्र, या मार्गावरील सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून वातानुकूलित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना गर्दीच्या प्रवासाला सामोरे जावे लागेल.

डहाणू रोड-अंधेरी लोकलची सेवा चर्चगेटपर्यंत सकाळी ६.०५ वाजता डहाणू रोडवरून सुटणारी अंधेरी जलद लोकलची सेवा सोमवारपासून चर्चगेटपर्यंत वाढवली आहे. ही लोकल चर्चगेट येथे सकाळी ८.२३ वाजता पोहचेल. तर, डाऊन दिशेने जाताना ही लोकल सायंकाळी ७.१७ वाजता चर्चगेटवरून सुटणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.