Mumbai Dabbawala Association यांचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

114

मुंबई डबेवाला संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके (Ulhas muke) यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. मागील १३४ वर्षांपासून या संघटनेने कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. मात्र संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माच्या भावनांचा आदर राखणाऱ्या महायुतीला आमचा जाहीर पाठिंबा आहे. असे विधान मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णु काळडोके यांनी केले. (Mumbai Dabbawala Association)

डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णु काळडोके (Spokesperson Vishnu Kaldoke) म्हणाले की, ‘सुभाष तळेकर (Subhash Talekar) नामक व्यक्तीने २०११ साली एक बोगस संघटना स्थापन केली, या संघटनेत सगळे सदस्य घरातलीच दाखवले आहेत. या व्यक्तीमुळे डबेवाल्यांचं नाव खराब होत आहे. तसेच तळेकर आणि डबेवाला संघटना यांचा काहीही संबंध नाही. तळेकर यांच्यावर यापूर्वी गुन्ह्याची नोंद देखील झालेली आहे. कोविडच्या काळात २१ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे, असेही विष्णु काळडोके यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – “महायुतीसमोर व्होट जिहाद ही एकच समस्या”: Devendra Fadnavis)

दरम्यान, मागील ४० वर्षांपासून डबेवाले संघटना आपल्या हक्कांच्या घरासाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. विविध सरकार आले-गेले, काही ठिकाणी टोलवा-टोलवी झाली. यामध्ये डबेवाल्या संघटनेची कोणत्याच पक्षांनी दखल घेतली नव्हती. मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत भारती (MLA Shrikant Bharti) यांनी विधानसभेच्या पटलावर तारांकित प्रश्न उपस्थित करत डबेवाल्यांच्या घराची मागणी केली होती. तसेच महायुतीने या मागणीची पूर्तता करत सरकारच्या काळात भूखंड मंजूर झाले असून डबेवाला संघटना, जमीन जागा मालक, बिल्डर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक सुद्धा झाली आहे. तसेच डबेवाला संघटनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी ५ कोटी तर भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी २ कोटींचा निधी दिला आहे. डबेवाला संघटनेचे भवन सुद्धा उभारण्यात आले आहे. यामध्ये डिजिटल पद्धतीने सुरुवातीचा ते आतापर्यंतचा कालखंड दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. संबंधित प्रोत्साहन पाहता डबावाला संघटनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, असे विधान विष्णु काळडोके (Spokesperson Vishnu Kaldoke) यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.