संचारबंदीमुळे डबेवाल्यांची ‘उपासमार’!

जो गरमागरम घरचे जेवणाचे डबे कामाच्या ठिकाणी टेबलापर्यंत पोहचवून भूक भागवतो, असा मुंबईच्या डबेवाल्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संचारबंदी लागू केल्याने उपासमारीची वेळ आली आहे. 

78

महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव यामुळे राज्यभर ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. खासगी कार्यालये बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत जिथे दररोज ३-४ लाख कर्मचारी वर्ग मुंबईच्या उपनगर आणि आजूबाजूच्या महानगरांमधून येतो, तो आता घरून काम करत आहे. त्यामुळे साहजिकच कार्यालये बंद असल्याने डबेवाल्यांचाही धंदा बंद झाला आहे. त्यांच्यावरही या कडक निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यांनाही आर्थिक चणचण जाणवू लागणार असल्याने आता त्यांच्याकडूनही ठाकरे सरकारप्रति अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सरकारने मदत करावी!

मुंबईत एकूण 5 हजार डबेवाले आहेत. यातले 400-500 कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या नव्या निर्बंधांमध्ये फक्त 200 ते 250 डबेवालेच काम करत आहेत. सध्या आमच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आम्हाला सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे, असे डबेवाला संघटनेचे विष्णू काळढोके यांनी म्हटले आहे. मुंबईतला डबेवाला आणि त्यांचे मॅनेजमेंट हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र कोरोना, लॉकडाऊन यामुळे या मॅनेजमेंट गुरुंचे कंबरडे मोडून गेले आहे. आर्थिक अडचणीत हे सगळेच आहेत. डबेवाले हे मुंबई शहरात येणाऱ्या नोकरदारांचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत पोहचवण्याचे चोख काम करतात.

(हेही वाचा : धक्कादायक! कोरोनाकाळात वर्षभरात १ लाख भारतीयांचे मिशनरींकडून धर्मांतर! )

हमालीची कामे करण्याची आली वेळ!

डबेवाल्याचे हे काम अगदी सोपे वाटत असले तरीही मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ते ज्या प्रकारे वेळेचे मॅनेजमेंट करतात. त्यामुळे मुंबईचे डबेवाले हे कायमच चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरले आहेत. डबेवाल्यांचे कौतुक जागतिक स्तरावरही झाले आहे. या डबेवाल्यांमुळेच अनेक गृहिणी जेवणाचा डबा कार्यालयात पाठवू शकतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वर्क फ्रॉम होमवर जास्त भर देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईतल्या डबेवाल्यांना बसला आहे. कार्यालये, शाळा, कारखाने, बँका इथे डबे पोहचवण्याचा डबेवाल्यांचे काम सुरू आहे. मागचे वर्षभर हे काम कमी प्रमाणतच झाले आहे. अशात आता या डबेवाल्यांवर हमाली, रोजगार हमी योजनेची कामे, मजुरी किंवा लाकूड तोडण्याची वेळ आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.