Dadar Hawkers : फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय किती?; दादरकरांचा सवाल

36
Dadar Hawkers : फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय किती?; दादरकरांचा सवाल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

दादरमध्ये सध्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असून या कारवाईचे पडसाद राज्य विधीमंडळात उमटले. वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करताना दादरमधील फेरीवाले हे गिरणी कामगार असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, कोळंबकर यांनी दादरमधील फेरीवाल्यांना गिरणी कामगार असल्याचे संबोधून कारवाई थांबवण्याची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात दादरमध्ये सध्या असलेल्या फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे किती व्यवसाय आहेत हाच प्रश्न आता दादरमधील रहिवाशांकडून केला जात आहे. कोळंबकर यांचे हे विधान आता त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Dadar Hawkers)

मुंबई महापालिकेने सध्या २० ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये दादर पश्चिम रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दादर रेल्वे स्थानकापूसन दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बसण्यास न्यायालयानेच मज्जाव केला जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित असतानाच महापालिकेचे काही अधिकारी जाणीवपूर्वक दीडशे मीटर पुढील फेरीवाल्यांवर कारवाई करतात आणि दुसऱ्या बाजूला दीडशे मीटरच्या आतील परिसरात मात्र स्थानकाला फेरीवाल्यांकडून विळखा घातला जात आहे. त्यामुळे प्रवाशासंह पादचाऱ्यांना रेल्वे स्थानक परिसरातून या वाढत्या फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे बाहेर पडणे अशक्य होऊन बसले आहे. या वाढत्या गर्दीचा फायदा घेऊनच चोरीचे प्रकारही वाढू लागले आहेत. (Dadar Hawkers)

(हेही वाचा – कर्नाटकातील Congress सरकारचे हलाल बजेट; मुसलमानांना कोट्यवधींची वाटली खैरात)

दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत वडाळा विधानसभेतील भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुद्दा उपस्थित करत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जात आहे. परंतु दादर भागांमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय हे फेरीचा व्यवसाय करत असून एकाबाजूला आपण त्यांना कर्ज देतो आणि दुसरीकडे त्यांच्यावर महापालिका कारवाई करते हे योग्य नसल्याने याबाबत योग्य ते महापालिकेला निर्देश देण्याची मागणी केली. (Dadar Hawkers)

कोळंबकर यांनी दादरच्या फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार असल्याचे म्हटल्याने दादरमधील रहिवाशांकडून किती गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय दादरमध्ये व्यवसाय करतात हे दाखवून द्यावेच, असाच सवाल केला आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला कारवाई करायची सोडून १५० मीटरच्या पुढे कारवाई करून एकप्रकारे स्थानिक फेरीवाल्यांना त्रास दिला जातो, यावर कोळंबकर का काही बोलत नाही. दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारी सध्या मोठ्याप्रमाणात बाहेरच्या फेरीवाल्यांची संख्या वाढलेली असून भाजपानेच या भागांमध्ये रोहिंग्ये तसेच बंगाली मुसलमानांची संख्या वाढवल्याने त्यांच्या विरोधातच आंदोलन केले होते, मग दादरमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय व्यवसाय करतात असे कसे म्हटले जाते असाही सवाल केला जात आहे. (Dadar Hawkers)

(हेही वाचा – America तब्बल ४१ देशांच्या नागरिकांना करणार प्रवेश बंदी)

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मराठी माणूस तर औषधाला सापडेल एवढाच असून या परिसरात सर्व बाहेरचे परप्रांतिय फेरीवालेच अधिक आहे. या उलट दीडशेमीटरच्या परिसरात मराठी आणि स्थानिक फेरीवालेच अधिक आहेत. त्यामुळे पोलिस आणि महापालिका प्रशासन हे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईची तीव्रता कमी करण्यासाठी दीडशे मीटर बाहेरील स्थानिक फेरीवाल्यांवर कारवाई करतात, जेणेकरून विरोध वाढून ही कारवाई थांबेल अशाप्रकारचा यामागचा हेतू असतो असेही काही स्थानिकांचे म्हणणे आहे. (Dadar Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.