Mumbai Dam Water : मुंबईकरांना दिलासा! मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढला

1014
Mumbai Dam Water : मुंबईकरांना दिलासा! मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढला
Mumbai Dam Water : मुंबईकरांना दिलासा! मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढला

मुसळधार पावसामुळे (Mumbai Dam Water) मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत मुंबईतील धरणाचे पाणी तळाला पोहचले होते त्यामुळे काही भागांमध्ये पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण, जूनसुद्धा कोरडाच गेल्याने महानगर पालिकेवर पाणी प्रश्न सोडण्याचा अतिरिक्त ताण आला. आता अशातच जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील एक आठवडा पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा १.५१ लाख दक्षलक्ष लीटरने वाढला आहे. (Mumbai Dam Water)

(हेही वाचा –Drunk and Drive : कठोर कारवाईच लावेल अपघातांना ब्रेक!)

यंदा मुंबईतील धरणाने सर्वांत कमी पाण्याची पातळी गाठली होती. ऐन जुलैमध्ये पाणीसाठा फक्त ३.६१ लाख दक्षलक्ष लीटर इतकाच होता, पण जर आपण मागील वर्षासोबत तुलना केली तर मागील वर्षी जुलै महिन्यात ८.११ लाख दक्षलक्ष लीटर पाणी होते. तर २०२२ मध्ये ४.१२ लाख दक्षलक्ष लीटर इतके पाणी होते म्हणजे मागील तीन वर्षाच्या सरासरीत यंदा सर्वाधिक कमी पाणीसाठा तलावात आढळून आला. (Mumbai Dam Water)

(हेही वाचा –Konkan Heavy Rain : कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग; कोकण रेल्वे ठप्प)

बीएमसी दररोज शहराला ३९०० लक्ष पाणी पुरवत असते, म्हणजे पुढील ३९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या धरणात जमा झाला आहे. मागील महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाणीसाठा पूर्णपणे निच्चांकी क्रमांकवर नोंदवण्यात आला होता. जूनच्या पाच तारखेपासून मुंबईत महापालिकेने १० टक्के पाणीकपात सुद्धा सुरु केली आहे. अद्यापही धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नाही, त्यामुळे महापालिका धरणक्षेत्रात पाण्याचा हवा तितका साठा उपलब्ध नाही. आता जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली तर मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल अन्यथा ऐन मार्च – एप्रिलमध्ये मुंबईकरांना पुढच्या वर्षी पाणीबाणीची झळ सोसावी लागेल. (Mumbai Dam Water)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.