मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण तथा तलावांमध्ये १८ जुलैपर्यंत असलेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत विलक्षण वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून अडीच लाख ते पावणे तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठा असलेल्या धरणांमध्ये वाढ होत होत नव्हती. परंतु मागील चार दिवसांमध्ये जी वाढ पाहायला मिळालेली आहे, ती पाहता मुंबईकरांना धक्का बसणार आहे. कारण वाढलेला पाणीसाठा मागील चार दिवसांमध्ये तब्बल अडीच लाख दशलक्ष लिटरने वाढलेला पाहायला मिळालेला आहे. मुंबईकरांसाठी ही सर्वांत आनंदाची बाब समजली जात आहे.
सर्व धरणांमध्ये २ लाख ४४ हजार दशलक्ष लिटरचा पाणीसाठा!
मुंबईला दरदिवशी ३,८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी धरणांमधून हा पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्व धरणांमध्ये १८ जुलै २०२१ रोजी २ लाख ८७ हजार ८२ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा होता. परंतु २१ जुलै २०२१ रोजी हा पाणीसाठा ५ लाख ३१ हजार ७३४ दशलक्ष लिटर इतका होता. त्यामुळे या सर्व धरणांमध्ये २ लाख ४४ हजार दशलक्ष लिटरचा पाणीसाठा या सर्व धरणांमध्ये जमा झालेला आहे. म्हणून चार दिवसांमध्ये हा पाणीसाठा वाढलेला आहे.
(हेही वाचा : जनता कोमात, स्वबळाची ‘छमछम’ जोमात! आशिष शेलारांची टीका)
२१ जुलैच्या दिवशी मागील तीन वर्षांतील पाणीसाठा
२०२१ : ५ लाख ३१ हजार ७३४ दशलक्ष लिटर
२०२०: ४ लाख ०८ हजार ८८५ दशलक्ष लिटर
२०१९ : ७ लाख ६५ हजार ३२४ दशलक्ष लिटर
Join Our WhatsApp Community