असा करा मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 15 मिनिटांत!

113

आता मुंबई ते नवी मुंबई पर्यंतचा प्रवास 15 मिनिटांमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण, नविन वर्षात राज्यात मुंबई वाॅटर टॅक्सी सेवा सुरु होणार आहे. ही वाॅटर टॅक्सी जानेवारी 2022 पासुन सुरु होणार आहे. बहुप्रतिक्षित मुंबई वाॅटर टॅक्सी सेवा फेरीमुळे बेलापूर आणि नेरळ येथील टर्मिनल्स दरम्यान प्रवास करता येण्याची अपेक्षा आहे. या टॅक्सीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मागणी असणारे मार्ग

सरकारने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल ते एलिफंटा, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (डीसीटी) ते रेवस, करंजाडे, धरमतर, डीसीटी ते बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, खांदेरी बेटे आणि जेएनपीटी असे मार्ग विविध वाहतूक करणाऱ्यांना दिले आहेत. वाहतूक करणाऱ्यांचे म्हणणे आहे की डीसीटी ते जेएनपीटी आणि नंतर नवी मुंबई हा सर्वात जास्त मागणी असलेला मार्ग असेल.

लवकरच सेवेत

जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सध्या तीन ऑपरेटर तयार आहेत. पुढील दोन-तीन महिन्यांत त्यांचे कॅटमरान योग्य असल्याचे प्रमाणित झाल्यानंतर चौथा ऑपरेट सामील होऊ शकेल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी जहाजबांधणी मंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला. मुंबई पोर्ट ट्रस्टने डीसीटी बांधली आणि सिडकोने नवी मुंबईत टर्मिनल बांधण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मार्ग निश्चित केले. एमबीपीटीने खांदेरी बेटांवर काँक्रीटची जेट्टी बांधली.

असे आहे भाडे

डीसीटी ते नवी मुंबईचे भाडे प्रति प्रवासी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये असेल, तर जेएनपीटीचे भाडे सुमारे ७५० रुपये असू शकते. मुंबईतील डीसीटी ते जेएनपीटी आणि नवी मुंबईचे भाडे ८०० ते १ हजार १०० रुपये इतक भाडे असेल.

 ( हेही वाचा: बाटलीबंद पाणी पिताय? तर हे काळजीपूर्वक वाचा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.