राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबईतील विविध प्रशासकीय विभागांमध्ये १ मेपासून हाती घेण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेतंर्गत अर्थात सुक्ष्म पद्धतीने करण्यात येणाऱ्या डिप क्लिनिंग डाईव्ह अंतर्गत मागील १५ दिवसांमध्ये १०४२ मेट्रीक टनचा राडारोडा अर्थात डेब्रीज तसेच १३९ मेट्रीक टन कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईत कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची इतरही कार्यवाही होत असल्याने मुंबईकरांकडून समाधान व्यक्त होत आहे. (Mumbai Deep Cleaning Drive)
मनुष्यबळाबरोबरच ‘या’ संयंत्रांचाही वापर
मुंबईकरांच्या उत्तम, निरोगी आरोग्यवर्धनासाठी आणि मुंबई महानगराचा स्वच्छतेसाठीजगात नावलौकिक झाला पाहिजे, हे ध्येय ठेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम’ सुरू केली आहे. दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्ण स्वच्छता मोहीमेचा प्रारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कार्यवाही केली जात आहे. परिणामी, आतापर्यंत अवघ्या पंधरा दिवसात एकूण १०४२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), १३९ मेट्रिक टन घनकचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. त्यासाठी ३७०० कामगार-कर्मचाऱ्यांनी अविरत श्रमदान केले आहे. मनुष्यबळाबरोबरच जेसीबी (३३), डंपर (१४८), कॉम्पॅक्टर (२१), फायरेक्स मशीन (७१), वॉटर टँकर (६९), सक्शन मशीन (६), लिटर पीकर मशीन (३), रोड स्वीपिंग मशीन (९) आणि मिस्टिंग मशीन (७) याप्रमाणे एकूण ३६७ संयंत्रांचाही वापर करण्यात येत आहे. (Mumbai Deep Cleaning Drive)
(हेही वाचा – Bribery : लाचखोरीत नाशिककर अव्वल तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत मात्र सर्वात कमी सापळे)
व्यापक स्तरावर स्वच्छतेची कामे
मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे दर शनिवारी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे, सात परिमंडळातील सात विभागांमध्ये अर्थात वॉर्डांमध्ये ही संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. त्यासाठी परिमंडळातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणा त्या विशिष्ट वॉर्डामध्ये नेमून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात येते. रस्ते पाण्याने धुवून धूळमुक्त करण्याबरोबरच गल्लीबोळातील कचरा, राडारोड्याची विल्हेवाट लावली जात आहे. लहानसहान रस्ते व गल्लीबोळ, गटारे, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांचा परिसर, सार्वजनिक प्रसाधनगृहे स्वच्छ केली जात आहेत. सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. अनधिकृत फलक, भित्तीपत्रके, बेवारस वाहने हटवली जात आहेत. सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन, त्यावर कलात्मक संदेश तसेच जनजागृतीपर माहिती रेखाटून त्या सुंदर करण्यात येत आहेत. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून महानगराचे सार्वजनिक स्वरुप सुंदर झाल्यानंतर आता व्यापक स्तरावर व सखोल अशी स्वच्छतेची कामे केली जात आहेत. अशा प्रकारे टप्प्या-टप्प्याने संपूर्ण मुंबई नगरी अतिशय स्वच्छ, सुंदर आणि निरोगी रहावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. (Mumbai Deep Cleaning Drive)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community