- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत आता डिजिटल जाहिरात फलकांची (होर्डिंग) मागणी होत असून मुंबईत तब्बल ४०० डिजिटल जाहिरात बोर्ड स्थापित केले जाणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हे जाहिरात बोर्ड बसवले जाणार आहेत. खासगी कंपनी महापालिकेला हे जाहिरात बोर्ड बनवून देणार आहे. हे जाहिरात बोर्ड बनवून देतानाच याचे जाहिरात शुल्कही महापालिकेला दिले जाणार आहे, ज्यातून महापालिकेला प्रती महिन्याला अडीच कोटी रुपये आणि प्रत्येक वर्षी सुमारे ३० कोटी रुपये याप्रमाणे पुढील ९ ते १० वर्षांमध्ये सुमारे ३२८ कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत वाढणार आहे. (Mumbai Digital Board)
मुंबईतील बसवण्यात येणारे हे डिजिटल फलक (Mumbai Digital Board) महापालिकेच्या मालकीच्या पदपथावर रस्त्याच्या बाजुला आणि रस्ता दुभाजकावर उभारले जाणार आहेत. महापालिकेने जाहिरातींच्या मार्गदर्शक धोरणानुसार या डिजिटल फलकांची उभारी करण्यासाठी निविदा मागवली होती. ज्यात कंपनीला २०० डिजिटल फलक पाठोपाठ अर्थात ४०० डिजिटल जाहिरात बोर्डची व्यवस्था करावी अशी अट घातली होती. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी हे जाहिरात फलक लावले जाणार आहे. यासाठी बिझलिस्ट ऍडव्हर टाईजिंग एलएलपी या कंपनीची निवड झाली असून डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, मेंटेन आणि ट्रान्सफर या तत्वावर हे ४०० डिजिटल जाहिरात फलक लावले जाणार आहे. (Mumbai Digital Board)
(हेही वाचा – Savitri Jindal : काँग्रेसला मोठा झटका; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी दिला राजीनामा)
जाहिरात क्षेत्रात सध्या प्रचंड वाढ
या डिजिटल फलकावर (Mumbai Digital Board) जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी परवाना शुल्क म्हणून दर महा सुमारे अडीच कोटी याप्रमाणे वर्षाला ३० कोटी ६६ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. तर पुढील ९ वर्षांच्या कालावधीत ३३८ कोटी १७ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा महसूल अपेक्षित मानले जात आहे. परवाना शुल्काद्वारे महापालिकेला वर्षाला केवळ २०० ते २२५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो, त्यामुळे वर्षाला ३० कोटी रुपयांचा वाढणारा महसूल समाधान देणारा आहे. (Mumbai Digital Board)
महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहरात सध्या इमारत बांधकामे, मेट्रो, भुयारी मेट्रो, वाहतूक पूल अशी विविध प्रकारची विकासाची कामे प्रगती पथावर आहेत. त्यानुसार जाहिरात क्षेत्रात सध्या प्रचंड वाढ होत आहे. त्यातुलनेत महापालिकेच्या परवाना खात्याचा जाहिरातींच्या उत्पन्नाच्या स्त्रोत कमी असल्याचे दिसून आले आहे. या जाहिरातींचे उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर जाहिरात फलकांना (Mumbai Digital Board) परवानगी दिल्यास महापालिकेच्या महसूलात मोठ्याप्रमाणात वाढ होईल, त्यादृष्टीकोनातून महापालिकेचा एकही पैसा खर्च न होता महसूल वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला ९ वर्षांकरता जाहिरातींचे हक्क प्रदान केलेले आहेत. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जाहिरातीचे फलक हे महापालिकेला हस्तांतरीत केले जातील. मात्र, त्यावर कंपनीकडून कोणताही दावा केला जाणार नाही. महापालिकेला नागरी संदेशांसाठी प्रत्येक १ तासापैंकी १० मिनिटे मिळणार आहे आणि उर्वरीत कालावधी व्यावसायिक वापर करेल, असे संबंधित खात्याने स्पष्ट केले आहे. (Mumbai Digital Board)
(हेही वाचा – Major League Cricket : अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या हंगामासाठी तयार)
या भागात बसवले जाणार डिजिटल फलक
हाजी अली, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, दादर, परेल, वांद्रे कार्टर रोड, वांद्रे बँड स्टँड, सिद्धिविनायक रोड, लिकींग रोड, एस. व्ही. रोड., अंधेरी, मालाड पश्चिम, मालाड न्यू लिंक रोड, एम. जी. रोड शिव माथुरादास, अंधेरी कुर्ला रोड, चेंबुर, वर्सोवा, जुहू, खार, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पवई, गोरेगाव, वडाळा, माहिम, रेक्लेमेशन, लालबाग, शीव, जोगेश्वरी, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, मरोळ, मुलुंड, इस्टर्न फ्रि वे मार्ग. (Mumbai Digital Board)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community