Mumbai Disaster Management Control Room : मुंबईच्या कानाकोपऱ्यात महापालिकेची नजर; २४ विभाग कार्यालयातून सीसीटीव्ही वर लक्ष 

1069
Mumbai Disaster Management Control Room : मुंबईच्या कानाकोपऱ्यात महापालिकेची नजर; २४ विभाग कार्यालयातून सीसीटीव्ही वर लक्ष
Mumbai Disaster Management Control Room : मुंबईच्या कानाकोपऱ्यात महापालिकेची नजर; २४ विभाग कार्यालयातून सीसीटीव्ही वर लक्ष
राज्य शासनाच्यावतीने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या सुरक्षेकरता सार्वजनिक ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे.  त्यामुळे  पावसाळ्या तुंबणाऱ्या पाण्याची समस्या आणि झाडांच्या फांद्या तुटून होणारी वाहतूक कोंडी तसेच आगीसारख्या घटनांवर महापालिकेच्या मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. परंतु आता मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) २४ विभाग कार्यालयांमधून मुंबईच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांकडे या सी.सी.टिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य  नियंत्रण कक्षातून संपर्क साधून वॉर्ड ऑफिसला जागे करण्यात येत असले तरी आता सर्व वॉर्डच ऑफीसमध्ये सी.सी.टिव्ही निरीक्षण केंद्राची उभारणी करण्यात आल्याने स्थानिक पातळीवरच तातडीने आपत्कालिन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यासाठी तब्बल ९ कोटी रुपयांची रक्कम गृह विभागाला अदा करण्यात आली आहे. (Mumbai Disaster Management Control Room)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत मुंबई शहर संनिरिक्षण प्रकल्पांतर्गत (mcs)मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात निरिक्षण केंद्रांची उभारणी राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत करण्यात आलेली आहे व त्यासाठी लागणारा सर्व खर्च महाराष्ट्र शासनातर्फे अदा करण्यात आला होता. (Mumbai Disaster Management Control Room)
 तसेच, मुंबई महापालिकेच्या (Municipal Corporation) परळ येथील पर्यायी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात अतिरिक्त निरिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. या निरिक्षण केंद्राकरिताचा एकूण खर्च महापालिकेच्या  वतीने  राज्य शासनाच्या गृह विभागाला अदा करण्यात आलेला आहे. तसेच, या अतिरिक्त निरिक्षण केंद्राच्या उभारणी करता मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभाग या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. (Mumbai Disaster Management Control Room)
तत्कालीन महापालिका आयुक्त  प्रविण परदेशी (Praveen Pardeshi) यांच्या तोंडी आदेशानुसार  लार्सन एण्ड ट्युब्रो (Larsen & Toubro) या कंपनीने हे काम सन-२०२० च्या पावसाळ्यापुर्वी पूर्ण करावयाचे असल्यामुळे प्रथमतः एकूण २२ विभागीय नियंत्रण कक्षात संबंधित विभागीय कार्यालयाशी थेट समन्वय साधून निरीक्षण केंद्रे उभारुन कार्यान्वित केलेली आहेत. तसेच, उर्वरित २ विभागीय नियंत्रण कक्षाची कामेही पूर्ण करण्यात आलेली आहेत. विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षात संबंधित विभागातील सी.सी.टी.व्ही कॅमे-याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून संख्याबाबत विनंती केली व यासाठी येणारा खर्च महानगरपालिकेतर्फे राज्य शासनाच्या गृह विभागास देण्यात येईल असे कळविले होते. (Mumbai Disaster Management Control Room)
त्यानुसार,२४ विभागीय आपत्कालीन नियंत्रण कक्षात (MCS) प्रकल्पांतर्गत त्या त्या विभागाच्या हद्दितील (CCTV) कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देणे तसेच, एकीकृत दुरचित्रवाणी विश्लेषण प्रणाली आणि मुंबई महानगरपालिकेच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त ५०० सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याबाबत विनंती केली होती.  राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागीय आपत्कालीन नियंत्रण कक्षात निरीक्षण केंद्रांची उभारणी करणे तसेच, या निरीक्षण केंद्रांना आवश्यक असणारी इंटरनेट बॅन्डविथ पुरविणे व ०४  सप्टेंबर २०२२ पर्यंत निरीक्षण केंद्रांचे देखभाल करणे या कामाकरिता येणा-या खर्चासाठी राज्य शासनाने या कामासाठी नेमणूक केलेले तांत्रिक सल्लागार  पी.डब्यु.सी. यांनी  परिगणन केल्याप्रमाणे  याचा  खर्च अदा करण्याबाबत गृह विभागामार्फत कळविण्यात आहे. (Mumbai Disaster Management Control Room)
त्यानुसार २४ वॉर्डात विविंग सेंटर बनवणे यासाठी ५ कोटी ०२ लाख रुपये तसेच देखभाल  आणि दुरुस्तीसाठी ३ कोटी ८४ लाख रुपये अशाप्रकारे ८ कोटी ८६ हजार रुपये एवढा खर्च  होत असून ही रक्कम गृह विभागाला करण्यात आली आहे. (Mumbai Disaster Management Control Room)
आपत्कालीन विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत आधी बसवलेले ५ हजार कॅमेरे आणि त्यानंतर बसवण्यात आलेले ५ हजार कॅमेरे तसेच अन्य २ हजार कॅमेरे अशाप्रकारे एकूण १२ हजार  कॅमेरे यांच्या माध्यमातून मुंबईतील आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. (Mumbai Disaster Management Control Room)
मागील वर्षी ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून मागील वर्षी याचा उपयोग झाला. पण या वर्षी या यंत्रणेचा वापर पूर्ण क्षमतेने केला जाणार आहे. जेणेकरुन यंदा विभागीय आपत्कालीन नियत्रंण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना स्थानिक पातळीवरच समस्यांचे निवारण तातडीने आणि त्वरित करता येईल असे विभागाने स्पष्ट केले. मात्र, महापालिकेने सुचवलेले ५०० कॅमेरे अद्याप बसवलेले नाहीत. (Mumbai Disaster Management Control Room)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.