मुंबईसह या भागांत वीजपुरवठा खंडीत, लोकलही ठप्प!

99

मुंबईत मागच्या तासभरापासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या भागातं वीज गायब झाली आहे. सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात वीजपुरवठा खंडित, गेल्या एक तासापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.
यामुळे लोकल ट्रेन देखील ठप्प झाल्या आहेत.

…म्हणून वीज गायब

मुलुंडमधील ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. एका तासात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

(हेही वाचा: …तेवढा महाराष्ट्र एकवटणार, आदित्य ठाकरेंचा भाजपावर निशाणा! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.