Mumbai Fashion Street : मुंबईतील खाऊगल्लीने अडवला रस्ता

123
Mumbai Fashion Street : मुंबईतील खाऊगल्लीने अडवला रस्ता
Mumbai Fashion Street : मुंबईतील खाऊगल्लीने अडवला रस्ता
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दक्षिण मुंबईतील फॅशन स्ट्रीट (Mumbai Fashion Street) येथील खाऊगल्लीतील वाढत्या खवय्यांच्या गर्दीमुळे येथील रस्ताच आता अडवला जात आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना स्टॉल्स धारकांकडून रस्ता अडवून बसण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत या खाऊगल्लीतून पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरत नसून खाऊगल्लीने आता रस्ताही अडवून टाकल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा – अखेर 36 वर्षांनी दिलासा; रामजन्मभूमी आंदोलनाच्या खटल्यातून मंत्री Mangal Prabhat Lodha यांची निर्दोष सुटका)

चर्चगेट (Churchgate) येथील फॅशन स्ट्रीटच्या (Mumbai Fashion Street) मागील बाजुस असलेल्या खाऊ गल्लीतील खवय्यांची गर्दी आता वाढत चालली असून प्रत्येक स्टॉल्सधारकांकडून आपल्या समोरील जागेत तीन ते चार टेबल्स लावली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजुला असलेल्या स्टॉल्सधारकांकडून प्रत्येकी आठ ते दहा फुटांची जागा अडवली जात असल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा अडथळा पार करत रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे.

(हेही वाचा – MHADA Administration : म्हाडाच्या ११४ वसाहतीतील इमारतींचे सर्वेक्षण)

आझाद मैदानातून (Azad Maidan) फॅशन स्ट्रीट (Mumbai Fashion Street) येथील पायवाटेने खाऊ गल्लीतून चर्चगेट रेल्वे स्थानक गाठले जाते. परंतु संध्याकाळी नेहमीची लोकल पकडण्यासाठी घाईगडबडीत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या खाऊगल्लीतील गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे स्टॉल्स अधिकृत असले तरी त्यासमोरील जागा ते अडवू शकत नाही. परंतु एवढ्या मोठ्याप्रमाणात जागा अडवली जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील पायवाटेच्या जागेवर खुर्च्या टाकून ती जागा अडवण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.