Mumbai Festival : २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवल; गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण

130
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
Girish Mahajan : विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक

दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबईत प्रथमच २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या नऊ दिवसांच्या महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूडच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) केले. (Mumbai Festival)

गिरीश महाजन यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई फेस्टिवलच्या कार्यक्रमांची घोषणा केली. यावेळी फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना, शहराच्या समृद्ध ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम यांना एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास, सर्वसमावेशकता जोपासणे, उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे, असे महाजन यांनी यावेळी सांगितले. (Mumbai Festival)

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ हा केवळ एक कार्यक्रम नाही. हा एक परिवर्तनकारी अनुभव असून देशातील सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महाशॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्ट‍िव्हलमध्ये समावेश आहे, असेही महाजन म्हणाले. (Mumbai Festival)

तर मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे. मुंबईतील कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यावेळी सांगितले. (Mumbai Festival)

(हेही वाचा – Viksit Bharat Sankalp Yatra : गरजूंना वस्तूंचे वाटप; विकसित भारत संकल्प यात्रेला रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा)

इव्हेंट लाइन-अपमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्हायब्रंट म्युझिक फेस्ट, महामुंबई एक्स्पो, मनमोहक सिनेमा, बीच फेस्ट, मुव्ही स्पर्धा आणि रोमांचक क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप फेस्ट अशा विविध आणि आकर्षक उपक्रमांचा समावेश फेस्टिवलमध्ये आहे. मुंबई वॉक हे या फेस्टिवलचे वैशिष्ट्य आहे. या वॉकद्वारे मुंबईचे गतिचक्र कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या डबेवाला, पोलीस कर्मचारी, बेस्ट बसचे आणि वाहक तसेच सफाई कामगार, सफाई कर्मचारी आदी मुंबईवीरांचा सत्कार करण्यासाठी शहरातील नामांकित व्यक्ती एकत्र येतील. (Mumbai Festival)

मुंबई फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे शॉप ॲण्ड विन फेस्टिव्हल. ज्यामध्ये एकाधिक रिटेल आणि डायनिंग आउटलेट्स तसेच मनोरंजनाच्या संधींचा समावेश असेल, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते. (Mumbai Festival)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.