अग्निशमन दलाच्या ८ अधिकारी, जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक

फोर्ट येथील जीपीओसमोरील मिंट रोडवर असलेल्या पाच मजली इमारतीचा काही भाग मागील वर्षी जुलै महिन्यात कोसळला होता. त्यावेळी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत बाहेर काढले होते.

99

फोर्ट येथील भानुशाली इमारत दुघर्टनेच्यावेळी बचाव कार्य करणारे मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती शौर्य पदकाने तत्कालीन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी व विद्यमान उपायुक्त यांच्या प्रभात रहांगदळे आणि विद्यमान मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांच्यासह चार जणांना तर उल्हास नगर महापालिका अग्निशमन दलातील ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

फोर्ट येथील जीपीओसमोरील मिंट रोडवर असलेल्या पाच मजली इमारतीचा काही भाग मागील वर्षी जुलै महिन्यात कोसळला होता. या दुघर्टनेत १० जणांचे बळी गेले होते. या इमारतीच्या जिन्यासह काही भाग कोसळल्याने काही कुटुंबे आतमध्ये अडकली होती. या कुटुंबांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत बाहेर काढले होते. त्यामुळे या त्यांच्या शौर्यांची दखल घेत यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व जवानांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आली आहे.
यामध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या प्रभात रहांगदळे, हेमंत परब, आत्माराम मिश्रा आणि कृष्णत यादव यांना राष्ट्रपदी शौर्य पदक तर केंद्र अधिकारी अनिल पवार व अग्निशामक उत्तम राठोड यांना महापलिका आयुक्त शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
तर उल्हास नगर महापालिकेच्या अग्निशमन दलातील सहायक केंद्र अधिकारी बाळासाहेब बन्सी नेटके यच्यासह पंकज पवार ,संदीप आसेकर , राजेंद्र राजम आदी जवानांनाही राष्ट्रपदी शौर्य पदक जाहीर झाले आहे.

(हेही वाचा : आता नगरसेवक निधीतून मिळणार नाही १० लिटर कचऱ्याचे डबे!)

राष्ट्रपदी पदकासाठी यांच्या नावाची घोषणा (तत्कालीन पदे)

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी

प्रभात रहांगदळे : उपायुक्त (आपत्कालिन व्यवस्थापन)
हेमंत परब : मुंबई अग्निशमन उपप्रमुख अधिकारी
आत्माराम मिश्रा : विभागीय अग्निशमन अधिकारी
कृष्णत यादव : सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी

उल्हास नगर अग्निशमन दलाचे अधिकारी

बाळासाहेब बन्सी नेटके : सहायक केंद्र अधिकारी
पंकज पवार : जवान
संदीप आसेकर : जवान
राजेंद्र राजम : जवान

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.