गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये (Goregaon furniture market) शनिवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास भीषण आग (Mumbai Fire) लागली. लाकडी वस्तूचे समान ठेवलेल्या पाच ते सहा गाळ्यांना आग लागली असून आगीची तीव्रता वाढली आहे. तब्बल दोन हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली आहे.
हेही वाचा-Guillain Barre Syndrome या दुर्मिळ आजाराचे निदान कसे होणार ? डॅाक्टर काय सांगतात ? वाचा सविस्तर …
आगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दल (fire brigade), रुग्णवाहिका (Ambulance) आणि पोलीस देखील दाखल झाले आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ पाण्याचे बंब दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Mumbai Fire)
या आगीत लाकडी सामान, प्लास्टिक, थर्माकोल, प्लायवुड, भंगार सामान आदी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. अग्निशमन दलाने ११.१८ च्या सुमारास आगीसाठी श्रेणी १ ची वर्दी दिली होती. मात्र आगीची तीव्रता वाढताच ११.२४ वाजता आगीची श्रेणी क्रमांक २ ची वर्दी देण्यात आली. क्षणाक्षणाला आग अक्राळविक्राळ रुप धारण करीत होती. अग्निशमन दलाने अखेर ११.४८ च्या सुमारास श्रेणी ३ ची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. (Mumbai Fire)
हेही वाचा-“ट्रम्प २०२० साली हरले नसते तर…” ; Vladimir Putin यांनी ट्रम्प यांचा उल्लेख करत केलं मोठं विधान
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी हे फर्निचर गोदाम आहेत त्या परिसरात रहिवासी वस्ती सुद्धा आहे. आग झपाट्याने पसरत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आसपासचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. फर्निचरमुळे आग वेगाने पसरत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Fire)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community