मुंबईतील माहीम (Mahim Fire News) परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला सोमवारी (०७ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने काहीजण इमारतीत अडकून पडल्याची माहीती आहे. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले होते. (Mumbai Fire News)
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले. ( Mumbai Fire News)
(हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने BJP ची खरडपट्टी का काढली ?)
मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक होत आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एका दुमजली घराला रविवारी (ता. ६) भीषण आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा देखील समावेश होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community