मुंबईतील पहिली Underground Metro लवकरच धावणार!

237
मुंबईतील पहिली Underground Metro लवकरच धावणार!

मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो (Underground Metro) लवकरच सुरू होणार आहे, यामुळे मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मेट्रो-३ हा ३३ किमीचा भूयारी मार्ग कुलाबा-बीकेसी-सिप्झ असा आहे. या मेट्रोमुळे मुंबईतील ट्रॅफिक समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी असा भुयारी मेट्रोचा (Underground Metro) पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना एक नवा प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची टर्म संपणार असल्याने, जुलैअखेर किंवा १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. (Underground Metro)

(हेही वाचा – ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी; CM Eknath Shinde यांचे आवाहन)

मेट्रो-३ चा बीकेसी ते आरे कॉलनीचा पहिला टप्पा तयार असून, त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. २४ जून रोजी आरडीएसओने या मेट्रोची ट्रायल पूर्ण केली होती. त्यामुळे बीकेसी ते आरे कॉलनी मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला होणार आहे. आरे कॉलनीतील कारशेडच्या मुद्द्यावर वादंग झाल्यानंतर, अनेक अडचणींचा सामना करून अखेरीस हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. भुयारी मार्गिकेत एकूण २७ स्थानके असून, या मेट्रोमुळे आतापर्यंत रेल्वे आणि मेट्रोशी जोडलेला नसलेला भाग आता मेट्रो मार्गिकेशी जोडला जाणार आहे. मुंबईच्या वाढत्या वेगाला या मेट्रोमुळे एक नवा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. (Underground Metro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.