मुंबईतील पावसाची सद्यस्थिती, पुढील काही तासांमधील पावसाचा अंदाज, (Mumbai Flood App) पाणी भरण्याची ठिकाणे आणि तेथील सद्यस्थिती याबाबतची इत्थंभूत माहिती आता कुठेही मिळू शकणार आहे. आयआयटी, मुंबईने खास मुंबईकरांच्या मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘मुंबई फ्लड ॲप’ तयार केले आहे. हे ॲप मुंबईकरांना आतापासून वापरता येईल.
(हेही वाचा –Vardha येथे मद्यधुंद चालकाच्या हातात वारकऱ्यांची एसटी; डिव्हायडरवर आदळली; जीवितहानी नाही)
आयआयटी, मुंबईच्या क्लायमेट स्टडीज आणि सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मुलांनी एकत्र येत हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यासाठी त्यांना एचई-आयआयटीबी इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून आणि एचडीएफसी अर्गोचे सहकार्य मिळाले. प्रा. रघू मूर्तुगुड्डे आणि डॉ. सुबिमल घोष यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. हे ॲप मुंबईकरांना आतापासून वापरता येईल. (Mumbai Flood App)
विशेष म्हणजे, हे ॲप वेबपोर्टलच्या माध्यमातही उपलब्ध आहे. या ॲपवर पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष मॉडेल तयार केले आहे. त्याशिवाय मिठी नदी, वाकोला नाला अशा ठिकाणी बसवलेल्या सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची पातळीही समजणार आहे. या ॲपमध्ये नागरिकही आपापल्या भागांतील माहिती टाकू शकतील. ही माहिती इतरांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. या वैशिष्ट्याच्या मदतीने विविध ठिकाणांच्या सद्यस्थितीची माहिती उपलब्ध होणार आहे. हे ॲप वेबपोर्टलवर वापरणाऱ्यांना प्रत्यक्ष त्यावेळी स्थानिक हवामान केंद्रांजवळ पडणाऱ्या पावसाची माहितीही घेता येईल. (Mumbai Flood App)
हे ॲप कुठे उपलब्ध? (Mumbai Flood App)
https://mumbaiflood.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. सध्या हे ॲप अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असून ‘मुंबई फ्लड ॲप’ या नावाने गुगल प्लेस्टोअरमधून डाउनलोड करता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community