मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी फेब्रुवारीत सुरू होणार; किती असणार भाडे?

गेट ऑफ इंडिया मुंबई ते बेलापूर या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून होणार आहे. मुंबई प्राधिकरणाने नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला यासंदर्भात परवानगी दिली आहे. यानुसार सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू करण्यात येणार आहे.

देशात सर्वात पहिली वॉटर टॅक्सी सेवा ही नोव्हेंबर २०२२ पासून मुंबई ते अलिबाग या मार्गावर सुरू झाली. मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा या दरम्यान ही सेवा सुरू होती. परंतु प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही सेवा काही दिवसांमध्येत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नयनतारा कंपनीने गेट ऑफ इंडिया मुंबई ते बेलापूर अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळ आणि संध्याकाळी प्रत्येकी १ अशा फेऱ्या या वॉटर टॅक्सीच्या होतील.

फेऱ्यांच्या संभाव्य वेळा

  • बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया – सकाळी ८.३० वाजता
  • गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर – सायंकाळी ६.३० वाजता

तिकीट किती असेल?

या सेवेमुळे ऐन गर्दीच्या वेळेत बेलापूर ते गेट वे अंतर ६० मिनिटांमध्ये पार करता येणार असून त्यासाठी ३०० ते ४०० रुपये तिकीट दर आकारले जाणार आहेत. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई ते बेलापूर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here