मुंबईतील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी (water taxi project) सेवा मंगळपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आहे नवी मुंबईतील बेलापूर येथून गेट वे ऑफ इंडिया यादरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या वॉटर टॅक्सी सेवेलाही येत्या १५ दिवसांमध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने ( Maharashtra Maritime Board ) वॉटर टॅक्सी सेवेला परवानगी दिली असून बंदर प्राधिकरणाची परवानगी मिळताच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
मुंबई ते मांडवा जलमार्गावर जी हायस्पीड वॉटर टॅक्सी धावणार आहे, तीच बोट बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर चालविली जाणार आहे.
फेऱ्यांच्या संभाव्य वेळा
- बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया – सकाळी ८.३० वाजता
- गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर – सायंकाळी ६.३० वाजता
तिकीट किती असेल?
या सेवेमुळे ऐन गर्दीच्या वेळेत बेलापूर ते गेट वे अंतर ६० मिनिटांमध्ये पार करता येणार असून त्यासाठी ४०० ते ४५० रुपये तिकीट दर आकारले जाणार आहे. येत्या १५ दिवसांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुंबई ते बेलापूर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community